Wednesday, September 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पती पोलीस कोठडीत अन्‌ रुग्णालयात पत्नीचा मृत्यू; दरोड्याच्या...

Nashik Crime News : पती पोलीस कोठडीत अन्‌ रुग्णालयात पत्नीचा मृत्यू; दरोड्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या पतीवर आता खुनाचा गुन्हा

बजरंगवाडीतील धक्कादायक घटना

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पत्नीला (Wife) बेदम मारहाण करून पळून गेलेला पती आधीच एका मोबाईल चोरी आणि धडकेच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत (Police Custody) होता. मात्र, गंभीर जखमी १९ वर्षीय पत्नीने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडल्याने, कोठडीत असलेल्या या पतीचा नवा कारनामा उघडकीस आला आहे. संशयित पती आधीच चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असल्याने, या दुहेरी गुन्हेगारीच्या घटनेत मुंबई नाका पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

​इद्रीस मोहम्मद शेख (वय १९, रा. बजरंगवाडी, पुणे रोड) असे पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, नन्नी शेख उर्फ जरीना अस्लम शेख (वय १९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कौटुंबिक वादातून सोमवारी (दि. २१) सकाळी जरीना इंदिरानगर येथील माहेरी गेली होती. पत्नी (Husbend) माहेरी गेल्याच्या रागातून इद्रीसने तेथे जाऊन तिला बेदम मारहाण केली. दुपारी जरीना सासरी परतल्यानंतर संतापात असलेल्या इद्रीसने पुन्हा तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर अमानुष प्रहार केले. तिला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळून गेला. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दारूची नशा, चाेरीचा गुन्हा

मारहाणीनंतर पळून गेलेल्या इद्रीसने रविवारी रात्री दारूच्या नशेत इंदिरानगर भागात (Indiranagar Area) रिक्षाने एकाला धडक देऊन त्याचा मोबाईल हिसकावला होता. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर सोमवारी सकाळीच त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी (दि. २२) मुंबई नाका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा तपास सुरू केला असता, मृत विवाहितेचा पती इद्रीस शेख हा दुसऱ्याच एका गुन्ह्यात आधीपासूनच पोलिस कोठडीत असल्याचे समोर आले. पत्नीचा मृत्यू होण्यापूर्वीच पती पोलिस कोठडीत असल्याने आणि फिर्याद देण्यासाठी कोणी पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी हाेत खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह एकास अटक;...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका संशयितास (Suspected) पोलिसांनी सापळा रचून अटक...