नाशिक | प्रतिनिधी
मोबाईलमध्ये शूटिंग (Mobile Shooting) केल्याच्या जुन्या वादातून बोलावून घेतलेल्या तरुणांच्या हाणामारीत एका तरुणाचा कोयत्याने वार करून गच्चीवरून खाली ढकलून खून (Murder) करण्यात आल्याची थरारक घटना विल्होळी (Vilholi) येथील कोळीवाडा, गायकवाड गल्ली परिसरात घडली. राहुल संजय सरकटे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगाळ आणि दीपक एकनाथ पारधी या तिघांना तालुका पोलिसांनी (Nashik LCB Arrested Accused) अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम गाडेकर याने दीपक पारधी व ज्योती बोंबले यांचे मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचा आरोप आहे. याच कारणावरून दीपक पारधी याने अजय गांगुर्डे व वैभव मेंगाळ यांना मारहाण करण्यासाठी १७ऑगस्ट रोजी विल्होळी येथे बोलावून घेतले होते.
संपादकीय : १९ ऑगस्ट २०२६ – महाराष्ट्राचे औद्योगिक अरिष्ट
रात्री साडेदहाच्या सुमारास संशयितांनी रमेश खरे व राहुल सरकटे यांची पिकअप गाडी मच्छीमार्केट परिसरात अडवली. त्यानंतर ते शांताराम गाडेकर यांच्या घरी गेले. संशयितांकडून मारहाण होण्याच्या भीतीने शांताराम गाडेकर, रमेश खरे व राहुल सरकटे घराच्या जिन्याने दुमजली गच्चीवर पळाले.
मात्र, संशयितांनी त्यांचा पाठलाग करून गच्ची गाठली. यावेळी अजय गांगुर्डे याने तू मध्ये आला, अगोदर तुलाच मारतो, असे म्हणत राहुल सरकटेच्या डोक्यात कोयत्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या राहुलला वैभव मेंगाळ याने गच्चीवरून खाली ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या पाच तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. एस. पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, उपअधीक्षक विमला एम. व उपविभागीय अधिकारी धकारी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शीतल गायकवाड, निलेश मराठे, दत्तात्रय वाजे तसेच पोलीस शिपाई मंगेश पानझाडे, योगेश पाटील, अरुण रेहरे व हरी शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली




