Tuesday, November 24, 2026
HomeनाशिकNashik Crime News : फक्त 'मुळे' उरली, गांजा गेला मातीखाली! 'फुले' येण्यापूर्वीच...

Nashik Crime News : फक्त ‘मुळे’ उरली, गांजा गेला मातीखाली! ‘फुले’ येण्यापूर्वीच पोलिसांनी उधळला सव्वा दोन कोटींचा गांजा लागवडीचा डाव

मातीखाली दडवलेला मुद्देमाल जेसीबीने उकरला

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गांजाच्या (Ganja) झाडांना फुले व बोंड आल्यानंतरच बाजारात त्याला खरा आणि मोठा भाव मिळतो. महिन्याभरात ही झाडे फुलोऱ्यावर येऊन विक्रीसाठी सज्ज होणार होती; मात्र त्यापूर्वीच तालुका पोलीस, हरसूल पोलीस (Police) आणि महसूल यंत्रणेने संयुक्त कारवाई करत सव्वा दोन कोटी रुपयांचा गांजा लागवडीचा डाव उधळून लावला आहे.  विशेष म्हणजे, कारवाईची कुणकुण लागताच संशयिताने कापून खड्ड्यात गाडलेला तब्बल १,२१० किलो मुद्देमाल पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने जमीन उकरून बाहेर काढला.

- Advertisement -

या प्रकरणी संशयित वामन संतु गुंबाडे याला अटक (Arrested) केली आली असून, सोमवारी (दि. २३) न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नाईकवाडी शिवारातील दुर्गम डोंगराळ भागात चार एकर क्षेत्रावर वाल आणि टोमॅटोच्या पिकाआड बेकायदेशीर गांजाची शेती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २१) रात्री आणि रविवारी (दि. २२) पहाटे संयुक्त पथकाने छापा टाकला. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने सर्व झाडे कापून शेतात खड्डे खणून गाडून टाकली होती.

घटनास्थळी पोलिसांना केवळ कापलेल्या झाडांची मुळे दिसून आली. पक्की खबर असल्याने पोलिसांनी माघार न घेता परिसराचा बारकाईने शोध घेतला. माती भुसभुशीत असल्याचे लक्षात येताच जेसीबी बोलावून खोदकाम करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला ९८० किलो आणि त्यानंतर २३० किलो असा एकूण १,२१० किलो (सव्वा दोन कोटी रुपये किमतीचा) गांजासदृश मुद्देमाल व वाहतुकीसाठी वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले.

​मोठ्या सूत्रधाराचा संशय

या शेतातील (Farm) झाडे चार ते सहा महिन्यांची असून, ती परिपक्व होण्याच्या टप्प्यावर होती. इतक्या मोठ्या प्रमाणात लागवड करणे आणि थेट ग्राहक शोधणे एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे असल्याने यामागे मोठी साखळी किंवा सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक केल्यापासून संशयित वामन गुंबाडे तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याला ही कल्पना कोणी दिली, आर्थिक गुंतवणूक कोणाची आहे आणि विक्रीचे जाळे कुठपर्यंत पसरले होते, याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक मृदुला नाईक करत आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अशा दुर्गम भागांत सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांवर करडी नजर ठेवून शोधमोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

साहित्य

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे...

0
पुणे | Puneमराठी साहित्यविश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १०० व्या...