नवी दिल्ली | New Delhi
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये 2027 च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा उशिराने होण्याची शक्यता आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पंजाबमध्ये पुन्हा एकदा दोन जुने राजकीय मित्र पक्ष एकत्र आले आहेत.
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून सप्टेंबर २०२० मध्ये तुटलेली ही जुनी मैत्री सुमारे सहा वर्षांनंतर पुन्हा अस्तित्वात आली आहे.
यावेळी अमित शहांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, अकाली दल आणि भाजप या पक्षाच्या दोन्ही प्रमुखांनी बसून हा निर्णय घेतलाय की पंजाब विधानसभा एकत्र लढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशी सुखबीर सिंग बादल यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अकाली दलाच्या पुनरागमनामुळे एनडीए पुन्हा पूर्ण झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटल्याचेही त्यांनी सांगितले.
Nashik News: सिंहस्थाच्या तयारीत रोजगाराच्या संधी बंद; टपऱ्यांना परवानगी देण्यास मनपाचा नकार
युती ही हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक
अमित शाह पुढे म्हणाले की, अकाली दल हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. आम्ही यापूर्वी एकत्र अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यात कधी विजय मिळवला, तर कधी पराभवाचा सामना केला. आज हे नाते पुन्हा एकदा जोडले जात आहे, जुन्या मित्राचे स्वागत आहे. भाजप आणि अकाली दलाची युती ही हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक आहे. भाजप आणि अकाली दल निवडणुका लढताना पंजाबसाठी अनेक घोषणा करू, असे यावेळी शहांनी म्हटले. तसेच, दोन्ही पक्ष लवकरच संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करतील आणि ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत पंजाबला पूर्णपणे नशामुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प या निवडणुकीत मांडला जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.
#WATCH | Delhi: Union Home Minister Amit Shah says, “It is a matter of immense joy that the National Democratic Alliance’s (NDA) oldest ally, the Shiromani Akali Dal (SAD), is returning to the NDA once again today. I heartily welcome all colleagues of the Akali Dal and Sardar Sukhbir Singh Badal ji into the NDA… Yesterday, when I spoke with the Prime Minister about the expansion of the NDA, the Prime Minister also called Sukhbir ji and our President and expressed the sentiment that the NDA is now complete, that the NDA becomes complete only with Badal Sahab’s party. I believe that in Punjab, across the entire country, and in the world, this alliance will become a symbol of Hindu-Sikh brotherhood, and both parties will move forward together in this direction.”— ANI (@ANI) November 24, 2026
“ही संधीसाधू आणि पंजाबद्रोही युती” काँग्रेसची टीका
दुसरीकडे, भाजप आणि अकाली दलाच्या या युतीवर विरोधी पक्षांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष परगट सिंह यांनी या युतीचा निषेध करताना म्हटले की, “ही पूर्णपणे दिशाहीन, संधीसाधू आणि पंजाबच्या जनतेशी द्रोह करणारी राजकारण नीती आहे. शेतकरी आंदोलनात आमच्या ७५० शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. ही युती पंजाबच्या भल्यासाठी नसून राज्याच्या बरबादीला जबाबदार राहिलेल्यांची आहे. मी अशा राजकारणाला पूर्णपणे नाकारतो.”




