Saturday, September 19, 2026
HomeनाशिकNashik Crime News : देवीचा चांदीचा मुकुट चोरणारा जेरबंद; पंचवटी पोलिसांची कामगिरी 

Nashik Crime News : देवीचा चांदीचा मुकुट चोरणारा जेरबंद; पंचवटी पोलिसांची कामगिरी 

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटी भागातील सप्तश्रृंगी माता देवीच्या मंदिरातील १० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरी करणाऱ्या आरोपीला पंचवटी पोलीस ठाण्याच्या (Panchvati Police Station) गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक (Arrested) केली आहे. संशयिताकडून ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीता गुंफा रोड येथील सप्तश्रृंगी माता देवी मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट ०७ सप्टेंबर रोजी चोरीस गेला होता. याप्रकरणी १५ सप्टेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.तपासादरम्यान रामकुंड परिसरात एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार घाडगे व आगोणे यांना गुप्तबातमीदाराकडून मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव विशाल कन्हैयालाल खत्री (वय २९, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असे सांगितले.

पोलिसांनी (Police) त्याला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्याने सप्तश्रृंगी माता देवी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अंमलदार सतीश शिरसाठ, कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, अमोल काळे, लोणारे,राहुल लभडे घाडगे, चारोरकर, जगताप, गायकवाड, वायकंडे, चितळकर, बहिकर, आगोणे, देशमुख, जाधवर, पाटील, पवार, अंकुश काळे, परदेशी आणि रोहिणी भोईर यांच्या पथकाने पार पाडली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार कैलास शिंदे करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गावागावात जनसंपर्क;...

0
नाशिक | Nashik शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, विसापूर, ता. कळवण येथील विद्यार्थ्यांची (Student) शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी (Teachers and Staff) गावागावात जाऊन विद्यार्थ्यांच्या,...