Sunday, April 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अवैधरीत्या गॅस भरणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखा युनिट...

Nashik Crime News : अवैधरीत्या गॅस भरणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखा युनिट १ व भद्रकाली पोलिसांची कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरगुती गॅस सिलिंडरमधून (Domestic Gas Cylinder) अवैधरित्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या चार संशयितांकडून ३३ घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्या व १३ व्यावसायिक सिलिंडरच्या टाक्यांसह इतर वस्तू असा ३ लाख १५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट १ व भद्रकाली पोलीस ठाणे यांनी संयुक्तिक कारवाई हस्तगत केले.

- Advertisement -

अमेरिका व इराण (America and Iran) यांच्यात सुरू असलेल्या युध्दामुळे घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवठा निर्माण झालेला असतांना अवैधरित्या घरगुती गॅसमधून व्यावसायिक गैस सिलिंडरमध्ये गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांचा शोध घेवुन त्यांच्यावर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सूचना दिल्या होत्या.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती

गुन्हे शाखा, युनिट क्रमांक १ चे हवालदार नाझीमखान पठाण व हवालदार संदीप भांड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, काही व्यक्ती हे भद्रकाली येथील कुट्टी बाजार येथे एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडरमधून साहित्याच्या मदतीने व्यवसायीक गॅस सिलिंडरमध्ये धोकदायकरित्या बेकायदेशीरपणे भरत आहेत. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांना दिली.

डॉ. मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र.१ चे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, विशाल काठे, अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार सतीश साळुंके, कयुम अली सैयद, अविनाश जुदरे, प्रभाकर आहेर, अंमलदार सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे यांच्या पथकाने संयुक्तरित्या कु‌ट्टी बाजार येथे सापळा रचला.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी

यावेळी संदीप संतोष चव्हाण (२८, रा. भीमवाडी, गंजमाळ, नाशिक), आसिफ अहमद शेख (३६, रा. हॅपीहोम कॉलनी, नाशिक), अनिल लहुघोडे (२९, रा. आम्रपाली रोड, कॅनलरोड, उपनगर, नाशिक), संतोष अशोक पटेकर (२८, रा. आम्रपाली रोड, कॅनल रोड, उपनगर, नाशिक) हे दोन वेगवेगळया गॅस भरण्याचे अनधिकृत मशिनच्या सहाय्याने घरगुती वापरासाठी असलेला एलपीजी गॅस सिलिंडरमधून व्यवसायीक गॅस सिलिंडरमध्ये बेकायदेशीर रित्या भरतांना आढळून आले.

पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेवुन ३३ घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्या व १३ व्यावसायिक सिलिंडरच्या टाक्या, २ गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे मशिन, २ ग्रॅसचे वजन करण्यात येणारे इलेक्ट्रिक वजन काटे, १ तीनचाकी मालवाहतूक करणारे वाहन असा ३ लाख १५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सर्व संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?

ताज्या बातम्या

Asha Bhosle Passed Away : आशाताईंच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. काल (शनिवारी) रात्री त्यांना हृदय विकाराचा...