नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik
परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत नाशिकरोड पोलिसांच्या (Nashik Road Police) गुन्हे शोधपथकाने एका संशयिताला अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?
गुन्हे नाशिकरोड शोधपथकातील पोलीस अंमलदार विशाल कुंवर आणि समाधान वाजे यांना सुभाष रोड परिसरातील कदम कंपाऊंड येथे एक इसम पिस्तूलसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सपोनि प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून साध्या वेशात छापा टाकला. यावेळी संशयिताने (Suspected) पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : अवैधरीत्या गॅस भरणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखा युनिट १ व भद्रकाली पोलिसांची कामगिरी
अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदिल नमिल सय्यद (वय ३९, रा. गोसावीवाडी, नाशिकरोड) असे आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा (मॅगझीनसह) आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भामरे करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे केली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती




