
इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यातील भावली धरण परिसरात (Bhavali Dam Area) पर्यटकांना मारहाण करून फरार असलेल्या मुख्य तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. या घटनेमध्ये फरार असलेले कैलास भागडे, आकाश भोईर व तुषार कडु या संशयित आरोपींना आज (दि. १६) रोजी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भावली धरणाच्या धबधब्या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाला १५ ते २० किलोमीटर पाठलाग करत मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना रविवार दि. १२ रोजी घडली होती. यातील ९ संशयित आरोपींना पोलीसांनी दोन दिवसांपूर्वी अटक (Arrested) केली होती. मात्र, हल्ला करून तीन मुख्य आरोपी फरार झाले होते.
संशयितांची नावे
विशाल मच्छिंद्र भटाटे (वय २७), अनिकेत गणेश मानवेढे (वय २४),अनिरुद्ध विठोबा भागडे (वय २५), सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (वय २२), विनोद लक्ष्मण बोराडे (वय २६), सचिन दत्तू आडोळे (वय २९), अर्जुन चिंधू आडोळे (वय २५), देविदास कचरू भगत (वय २५), आणि अजय भूषण दालभगत (वय २०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
तीन दिवसांची कोठडी
भावली धरण परिसरात (Bhavali Dam Area) पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या नऊ संशयित आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) मंगळवारी (दि.१४) रोजी अटक केली होती. त्यानंतर बुधवारी (दि.१५ रोजी) त्यांना इगतपुरी पोलीसांनी इगतपुरी न्यायालयात (Igatpuri Court) हजर केले असता तीन दिवसांची म्हणजेच शनिवार (दि.१८ जुलै) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




