Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News : जुन्या वादातून शिवसेना पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

Nashik Crime News : जुन्या वादातून शिवसेना पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून शिवसेना (शिंदे पक्ष) पदाधिकारी सुयश पाटील (Suyash Patil) यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला (Attack) झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दत्त चौक परिसरात घडली.

- Advertisement -

याबाबत जखमी सुयश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ते सेंट्रल पार्कच्या पाठीमागील त्यांच्या ‘सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ कार्यालयात असताना पंकज सोनवणे, विजय कांची, वैभव निकम यांच्यासह चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक येत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात सुयश पाटील हे गंभीर जखमी (Injured) झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी (Citizen) तत्काळ मदत करत त्यांना खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. दरम्यान, हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...