Saturday, October 17, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या; 'श्री राम रबडीवाला'ची नोंदणी FDA...

Nashik Crime News : सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या; ‘श्री राम रबडीवाला’ची नोंदणी FDA कडून निलंबित

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नवीन नाशकातील (New Nashik) पाटीलनगर परिसरातील श्री राम रबडीवाला या प्रसिद्ध आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रबडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळून आल्याने आणि आस्थापनेत आरोग्याच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याने प्रशासनाने या दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ही तपासणी करण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी वैभव गदेव आणि संकेत येलमामे यांनी केलेल्या तपासणीत अन्नात अळ्या आढळल्याने आणि स्वच्छतेचा अभाव दिसून आल्याने ही कठोर कारवाई (Action) करण्यात आली.

नागरिकांच्या (Citizen) आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नस-रक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कोणतीही दयेची भूमिका घेतली जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे. तसेच अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करताना काटेकोर स्वच्छता बाळगावी, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आग

नाशिकरोडच्या MSEB कार्यालयाला आग, मोठ्याप्रमाणात साहित्य जळून खाक

0
नाशिक रोड | प्रतिनिधीनाशिक पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) असलेल्या बिटको चौकातील (Bitco Chowk) महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या (MSEB Building) एका विभागाला आज सकाळी...