Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : आजपासून 'पेनड्राईव्ह'चा पंचनामा; खरातच्या 'त्या' व्हिडिओ क्लिप्सचा...

Ashok Kharat Crime News : आजपासून ‘पेनड्राईव्ह’चा पंचनामा; खरातच्या ‘त्या’ व्हिडिओ क्लिप्सचा SIT करणार तपास

नाशिक | Nashik

भोंदू व स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयातील एका कामगाराच्या गर्भवती पत्नीचा शीलभंग करुन लैंगिक शोषण केल्याच्या दाखल तिसऱ्या गुन्ह्यात आता एसआयटी ‘पेनड्राईव्ह आणि व्हिडिओ क्लिप्स’ चा तपास आज (दि. ९) पासून करणार आहेत. एकूण तेरा गुन्ह्यांच्या मालिकेत हा गुन्हा सर्वात संवेदनशील असून याप्रकरणी आज (गुरुवारी) खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातला तिसर्‍या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील ३५ वर्षीय फिर्यादी हा खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ मध्ये कामगार होता. खरातने त्याच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला ‘बाळासाठी विधी’ करण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलावून घेत तिचे शोषण केले होते. मात्र, खरातचा हा ‘अघोरी’ चेहरा जगासमोर आणण्यासाठी फिर्यादीने एक धाडसी पाऊल उचलले. त्याने खरातच्या के बिनमध्ये छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. या कॅमेऱ्याने खरातचे सर्व काळे कारनामे कैद केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ; सहा जणांना अटक

फिर्यादीने मित्राच्या मदतीने डीव्हीआरमधून हे सर्व व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये घेतले. या क्लिप्समध्ये खरात महिलांना (Woman) गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करताना स्पष्ट दिसला आहे. खरातला या व्हिडिओ क्लिप्सचा सुगावा लागताच त्याने फिर्यादीला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, आता याच व्हिडिओ क्लिप्सच्या पुराव्यांनुसार एसआयटी खरातच्या ‘अघोरी साम्राज्याचा’ पंचनामा करणार आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती

एसआयटीची आक्रमक पावले

खरात सध्या न्यायालयीन कोठडीत असला तरी, या तिसऱ्या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता एसआयटी त्याला पुन्हा पोलीस कोठडीत घेणार आहे. कामगाराच्या पत्नीवरील अत्याचाराचा हा गुन्हा खरातच्या विरोधातील सर्वात भक्कम पुरावा असल्याचे सूत्रांनी सांगितले असून प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट

ताज्या बातम्या

Crime News : डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावरही गुन्हा; नगर तालुका पोलिसांचा...

0
नगर । तालुका प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे...