Tuesday, October 6, 2026
Homeक्राईमNashik Crime News : "आधी माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले,...

Nashik Crime News : “आधी माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, नंतर ब्लॅकमेलिंग करत…”; पोलिसांनी संशयिताला ठोकल्या बेड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा आणि डिजिटल युगातील ऑनलाईन (Online) सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, एका माजी विद्यार्थ्याने आपल्याच महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे खाजगी व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, जालन्याच्या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड (रा. अंबड, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या संशयित माजी विद्यार्थ्याचे (Student) नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पाेलिसांच्या माहितीनुसार, संशयित चेतन हा पीडित महिला प्राध्यापिका कार्यरत असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. प्राध्यापिकेची दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यानंतर संशयिताने संधी साधून त्यांच्याशी पुन्हा संपर्क वाढवला. गोड बोलून विश्वास संपादन करत त्याने प्राध्यापिकेला प्रेमसंबंधात ओढले. याच काळात संशयिताने प्राध्यापिकेचे खाजगी स्वरूपाचे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड करून घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांची गोपनीय माहितीही गोळा केली.

काही दिवसांनंतर संशयिताने आपले खरे रूप दाखवत प्राध्यापिकेवर महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) एका आठवड्याच्या ट्रिपला येण्यासाठी दबाव टाकला. प्राध्यापिकेने या अयोग्य मागणीस स्पष्ट नकार दिला. त्यानंतर संशयिताने स्क्रीन रेकॉर्ड केलेले खाजगी व्हिडिओ आणि चॅट्स सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी त्याने प्राध्यापिकेकडे थेट पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पीडितेच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी संशयित चेतन राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस पथकाने तातडीने कारवाई करत संशयिताला अटक (Arrested) केली असून नाशिक जिल्हा न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ करत आहेत.

नातेवाईकांना मेसेज करून धमक्या

प्राध्यापिकेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयिताची मजल आणखी वाढली. त्याने प्राध्यापिकेच्या बहीण आणि वाहिनीला मेसेज करून माझ्या सांगण्याप्रमाणे वागले नाही, तर संपूर्ण कुटुंबाची समाजात बदनामी करेन, अशा धमक्या दिल्या. या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित प्राध्यापिकेने हिंमत दाखवत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

ताज्या बातम्या

default-featured-image

India Alliance Protest : राहुल गांधींचा गनिमी कावा; निवडणूक आयोगाच्या दारावर...

0
नवी दिल्ली | New Delhi विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज (मंगळवारी) केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांना हटविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा...