Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : तांत्रिक विश्लेषण करताना अडथळे; संशयित दानिश शेखच्या फेस...

Nashik TCS Case : तांत्रिक विश्लेषण करताना अडथळे; संशयित दानिश शेखच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील टीसीएस कंपनीत (TCS Company) धार्मिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणातील गुन्ह्यात नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने मुख्य संशयित तौसिफ अत्तारसह चौघांना अटक (Arrested) केली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना येत्या २९ एप्रिलपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

टीसीएस प्रकरणातील संशयित दानिश शेख (Danish Shekh) याने मोबाईलमधील प्रत्येक फाईल व अ‍ॅप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड सेट केले आहेत. त्यामुळे तांत्रिक विश्लेषण करताना अडथळे निर्माण झाले. त्या अनुषंगाने संशयितास दिंडोरी रोडवरील (Dindori Road) मेरी लगतच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत(एफएसएल) नेण्यात आले असून, त्याच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक करून पुढील तपास सुरू झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती पाहता विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्याची मागणी पोलीस आयुक्तालयाने (Police Commissionerate) शासनाकडे केली आहे. टीसीएस प्रकरणात न्यायालयाने संशयित तौसिफ बिलाल अत्तार (३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) व रझा रफीक मेमन (३५) यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ओपन बार’ आणि रात्रीचा गोंधळ; आदेशांची काही...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने होणारा विस्तार आणि बदलती जीवनशैली यासोबतच रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन ('ओपन बार') करण्याचे प्रमाण...