Thursday, October 22, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : साळुंकेच्या घराची झडती; लॅपटॉप जप्त, फॉरेन्सिक विश्लेषणातून घोटाळ्याचे...

Shalarth ID Scam : साळुंकेच्या घराची झडती; लॅपटॉप जप्त, फॉरेन्सिक विश्लेषणातून घोटाळ्याचे डिजिटल धागेदाेरे उघडकीस येणार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सुमारे १६० कोटी रुपयांच्या ‘शालार्थ’ घोटाळ्यात (Shalarth ID Scam) नाशिक शहर पोलिसांच्या (Nashik City Police) विशेष तपास पथकाने कारवाई करत मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या लॅब असिस्टंट तुषारकुमार साळुंकेच्या घराची झडती घेतली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील (Sakri Taluka) शेवाळी येथील त्याच्या घरातून ‘एसआयटी’ने एक लॅपटॉप जप्त केला असून, घोटाळ्याशी संबंधित संवेदनशील डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

- Advertisement -

​तांत्रिक शिक्षण घेतलेल्या साळुंकेने तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर करत बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात मुख्य भूमिका बजावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जप्त केलेल्या लॅपटॉपमधील माहितीचे (डाटा) फॉरेन्सिक विश्लेषण केले जात असून, यातून शिक्षण विभागातील आणखी बड्यांचे चेहरे उघडे पडण्याची चिन्हे आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘लॅब असिस्टंट’ (प्रयोगशाळा सहाय्यक) म्हणून कार्यरत असलेला तुषारकुमार साळुंके (Tushar Kumar Salunkhe) हा या घोटाळ्यातील महत्त्वाचा मध्यस्थ असल्याचे उघड झाले आहे. त्याला नाशिक जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून साळुंकेने संशयित संस्थाचालक प्रशांत वाडीले याच्याशी संधान बांधून शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे व नेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाच देऊन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता मिळवल्याचे तपासात निष्पन्न हाेत आहे.

विशेष म्हणजे, धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule Zilla Parishad) जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड करून त्याने बनावट आदेश आत शिरविले. साळुंके स्वतः काम करत असलेल्या शाळेतील दोन कर्मचाऱ्यांचाही या गुन्ह्यात सहभाग आढळला आहे. ​या प्रकरणात आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनीसह किरण पाटील, राहुल पवार, प्रशांत वाडीले, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, भाजप पदाधिकारी व संस्थाचालक संजय गरूड आणि त्याचा भाऊ दीपक गरूड या सात जणांना अटक झाली आहे. साळुंके हा या प्रकरणातील आठवा संशयित आहे.

​एकूण आठ संशयितांना बेड्या

मार्च २०२६ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दाखल या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त तथा एसआयटी प्रमुख संदीप मिटके व पथक करत आहे. नाशिक विभागातील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे तपासात उघड झाले असून, यापैकी सर्वाधिक म्हणजेच ६३८ कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत.

ताज्या बातम्या

ऑडिओ

ऑडिओ क्लिप दोन-अडीच वर्षांपूर्वीची, आताच कशी बाहेर आली? रामदास कदमांचा सवाल,...

0
मुंबई | Mumbaiमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात...