Saturday, October 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; दोघांना अटक,...

Nashik Crime News : पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; दोघांना अटक, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पेठ रोडवरील (Peth Road) म्हसरूळ परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा ५६ ग्रॅम एमडी जप्त केला.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ रोडवरील अश्वमेधनगर रिक्षा स्टँडसमोरील मोकळ्या पटांगणात, नामको हॉस्पिटलच्या (Namco Hospital) पुढे काही तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सोमवारी (ता. ७) रात्री साडेआठच्या सुमारास परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दर्शन गोरख गायकवाड (२२) आणि रोशन दिनकर लोखंडे (२३, दोघे रा. मातोरी, ता. जि. नाशिक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दर्शन गायकवाड याच्याकडून ५६ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष सौंदाणे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना मंगळवारी (ता. ८) पहाटे ४.२१ वाजता अटक करण्यात आली. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, अमोल मस्के तसेच पोलीस अंमलदार मनोज आहेर, निशिकांत नांद्रे, संदीप पोटिंदे, गुणवंत गायकवाड आणि प्रमोद गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. चौधरी करीत आहेत.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...