Sunday, May 31, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कमलेशच्या भोंदूगिरीचे जाळे राज्यभर; विमानाने उज्जैन, कोलकाता येथे...

Nashik Crime News : कमलेशच्या भोंदूगिरीचे जाळे राज्यभर; विमानाने उज्जैन, कोलकाता येथे नेऊन अघोरी पूजा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

तथाकथित कमलेश महाराज अधिकारी या भोंदू बाबाच्या अघोरी कृत्यांचा आणि फसवणुकीचा (Fraud) आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पसरल्याचे समोर येत आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता परजिल्ह्यातूनही फसवणूक झालेल्या पीडितांनी पोलिसांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), बीड आणि मुंबई येथील काही नवीन तक्रारदारांनी समोर येत भोंदू कमलेशविरोधात तक्रारी नोंदवल्याचे कळते. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

बहुतांश भोंदू हे नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा (Social Media) मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अहिल्यानगर येथील एका पीडितेने या भोंदूचे यू-ट्यूब चॅनल पाहून नाशिक गाठले होते. तिथे गेल्यावर भोंदूने त्याला पितृदोष असल्याचे सांगत नाशिक आणि उज्जैन येथे होमहवन करण्याच्या बहाण्याने तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातला.

पुणे जिल्ह्यातील (Pune District) लोहगाव येथील एका महिला तक्रारदाराला आरोग्याची गंभीर समस्या होती. याचाच गैरफायदा घेत भोंदू कमलेशने तिला तंत्रविद्या करण्याचा सल्ला दिला. पूजेच्या नावाखाली या महिलेला उज्जैन आणि कोलकाता येथे विमानाने नेण्यात आले. या संपूर्ण प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च पीडितेने केला. त्यानंतर स्मशानात अघोरी पूजा आणि पशुबळी देत भोंदूने या महिलेकडून ४ लाख रुपये उकळले, अशा स्वरुपाचे तक्रार अर्ज आल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

बीड आणि मुंबईतील नागरिकांनाही गंडा

बीडच्या (Beed) तक्रारदारास पितृदोष असल्याचे सांगून पूजेसाठी सुरुवातीला २१ हजार रुपये घेतले आणि नंतर आणखी २ लाख रुपयांची मागणी केली. शिवाय, मुंबईतील तक्रारदाराने नाशिक गाठून भोंदू कमलेशविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केल्याचे समजते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात सुरुवातीला तक्रार देणाऱ्या दोन भावांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोन भावांच्या मदतीनेच राज्यभरातील इतर पीडित नागरिकांचा शोध लागत आहे.

नागरिकांनी न घाबरता पुढे यावे – अंनिस

नागरिकांनी अजिबात न घाबरता अशा भोंदूंविरोधात पोलिसांत तक्रारी कराव्यात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) या लढ्यात पूर्णपणे नागरिकांच्या पाठीशी उभी आहे.

कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह, अंनिस)

ताज्या बातम्या

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची...