Monday, July 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बिल्डरांचे टेन्शन वाढले! म्हाडा, शालार्थ पाठोपाठ आता 'एमपीआयडी'चा...

Nashik Crime News : बिल्डरांचे टेन्शन वाढले! म्हाडा, शालार्थ पाठोपाठ आता ‘एमपीआयडी’चा तपासही वर्ग होणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये (Nashik) गेल्या काही महिन्यांत उघडकीस आलेले कोट्यवधी रुपयांचे घोटाळे (Scam) आणि हायप्रोफाईल गुन्ह्यांमुळे संपूर्ण तपास यंत्रणाच ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. नाशिक आयुक्तालयाच्या स्थानिक पाेलिस ठाण्यांमधील (Police Station) महत्त्वाचे आणि गुंतागुंतीचे गुन्हे एकापाठोपाठ एक शहर गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्लू) वर्ग केले जात आहेत. यामुळे आता नाशिक पोलिसांची (Nashik Police) आर्थिक गुन्हे शाखा हायप्रोफाईल घोटाळ्यांचे तपास केंद्र बनली असून, शहरातील अनेक संशयितांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

नुकताच सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) शहरातील काही नामवंत बिल्डरांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या (हितसंबंधांचे संरक्षण) वित्तीय आस्थापना कायदा अर्थात महाराष्ट्र प्राेटेक्शन ऑफ इंट्रेस्ट ऑफ डीपाॅझिटर्स अॅक्ट १९९९ आणि फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक स्तरावर सरकारवाडा पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असला, तरी या प्रकरणाची व्याप्ती आणि आर्थिक उलाढाल मोठी असल्याने हा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.

सध्या पोलिस या प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी आणि पुरावे संकलित करत असून, सबळ पुरावे हाती लागताच अधिकृतपणे तपास वर्ग केला जाणार आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच इतर गुन्ह्यांचा मोठा ताण असतो. त्यामुळे म्हाडा, शालार्थ आयडी आणि आता बिल्डरांचे एमपीआयडी प्रकरण (MPID Case) यांसारख्या क्लिष्ट आणि कोट्यवधींच्या घोटाळ्यांचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे देणे पोलिसांना सोयीचे ठरत आहे. मात्र, यामुळे आर्थिक गुन्हे शाखेवरील जबाबदारी वाढली आहे.

​लक्ष तपासाच्या ‘रिझल्ट’कडे

म्हाडा घोटाळ्यात क्राईम ब्रँचने काही संशयितांना अटक करून दणका दिला असला, तरी नाशिक रोड पोलिस ठाण्यातून वर्ग झालेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात सध्या आवश्यक प्रगती झालेली नाही. त्यामुळे आता नव्याने वर्ग होणाऱ्या बिल्डरांच्या ‘एमपीआयडी’ गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा किती गतीने लावते आणि संशयितांच्या मुसक्या आवळते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. बड्या बिल्डरांवरील कारवाईमुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

​गुन्ह्यांची मालिका आणि तपासाची सद्यस्थिती

  • १) म्हाडा घोटाळा –    सरकारवाडा  –  क्राईम ब्रँचकडे वर्ग; काही संशयितांना अटक, काहींची तात्पुरती सुटका.
  • २) बोगस शालार्थ आयडी –  नाशिक रोड –   गुन्हे शाखेकडे वर्ग; तपास संथ, प्रगतीची प्रतीक्षा.
  • ३) बिल्डरांवरील एमपीआयडी – सरकारवाडा: प्राथमिक तपासावर; लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार.

ताज्या बातम्या

default-featured-image

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...