Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गुन्हेगारीच्या आलेखात सिन्नर अग्रेसर; एक्केचाळीस पोलीस ठाण्यांच्या तुलनेत...

Nashik Crime News : गुन्हेगारीच्या आलेखात सिन्नर अग्रेसर; एक्केचाळीस पोलीस ठाण्यांच्या तुलनेत १,४०० गुन्हे

उपाययोजनांची आवश्यकता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील गुन्हेगारीचे (Criminal) आकडे पाहिले, तर सिन्नर पोलीस ठाण्याच्या (Sinnar Police Station) हद्दीतील वाढती नोंद सहज लक्ष वेधून घेते. अपघात व आकस्मिक मृत्यूंसाठी आधीच ‘नंबर एक असलेल्या सिन्नरला सन २०२५ मध्ये गुन्ह्यांची संख्याही तुलनेने अधिक राहिली. जिल्ह्यात नोंद झालेल्या १८ हजार ४२० गुन्ह्यांपैकी १ हजार ४१२ गुन्हे एकट्या सिन्नरमध्ये नोंद झाल्याने हा भाग गुन्हेगारीच्या दृष्टीने लक्षवेधी ठरला आहे.

- Advertisement -

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Rural Police) कार्यक्षेत्रातील ४१ पोलीस ठाण्यांच्या तुलनेत सिन्नरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असले, तरी त्यामागे लोकसंख्या, औद्योगिक वसाहत (एमआयडीसी), महामार्ग, वाहतुकीचा ताण आणि स्थलांतरितांची संख्या ही महत्त्वाची कारणे पुढे आली आहे. दुखापत, चोरी, जबरी चोरी, अपघात, दंगल, रॅश ड्रायव्हिंग, विनयभंग व अपहरण यांसारख्या गुन्ह्यांची येथे अधिक नोंद आहे.

हे देखील वाचा : Nashik News : तृतीयपंथीयांत उभी फूट; वसूली, धर्मांतरण व गुरुआज्ञेवरून पोलीस ठाण्यांत गुन्हे

जिल्हा पातळीवर २०२५ मध्ये ६३ खून आणि १८९ बलात्कार (Rape) नोंदले गेले असले, तरी गंभीर गुन्ह्यांचा डिटेक्शन रेट शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे, ही बाब तेवढी पोलिसांसाठी दिलासादायक आहे.सिन्नरमध्ये नोंदलेल्या गुन्ह्यांपैकी १ हजार २५९ प्रकरणे उघडकीस आली असून सराईत गुन्हेगार, संशयित टोळ्या, अवैध व्यवसाय यांच्यावर कारवाई वाढवल्याने नोंदींचा आकडा वर गेला आहे. हातभट्टी निर्मूलनासाठी महिला पोलिस पथक, अचानक धाडी, संशयितांवर नोटीस व हमीपत्रांची कारवाई यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व तेगबीर संधू यांनी सिन्नरसह इतर संवेदनशील ठाण्यांसाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारी नियंत्रण, अपघात रोखणे, रॅश ड्रायव्हिंगवर कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर भर देण्याचे निर्देश आहेत. दरम्यान, नांदगावला १ हजार १५, मालेगाव तालुका ९३८,सटाणा ९२३, चांदवड- ७७४, ओझर- ७४९, इगतपुरी-६२७सिन्नर एमआयडीसी ५४४ गुन्ह्यांची नोंद आहे.

हे देखील वाचा : Maharashtra ZP Elections : नाशिकसह उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी माहिती

मुद्दे

  • वर्षभरात जिल्ह्यात ६३ खून,
  • १८९ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद,
  • मनमाडमध्ये १ हजार १६१ गुन्हे

सन २०२५

प्रकार गुन्हे उघड
खून ६३ ६१
खुनाचा प्रयत्न ९५ ९५
सदोष मनुष्यवध १३ १३
बलात्कार १८९ १८९
दरोडा १६ १६

सिन्नरमधील स्थिती

प्रकार गुन्हे
दुखापत ३४१
चोरी ९८
दंगल ८७
रश ड्रायव्हिंग ६९
जुगार ४८
वाहतुकीला अडथळा ४६
विनयभंग ४४
अपहरण ४०
इतर ९८
प्रतिबंधक कारवाई २०९

ताज्या बातम्या

धडक

मजूरांसाठी काळरात्र ठरली! भरधाव ट्रकची पिकअपला जोरदार धडक; ८ जणांचा जागीच...

0
भंडारा | Bhandaraगोंदिया-बालाघाट मार्गावर नागरा-मोहरानटोली परिसरात ट्रक आणि प्रवासी पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू...