Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : तृतीयपंथीयांत उभी फूट; वसूली, धर्मांतरण व गुरुआज्ञेवरून पोलीस ठाण्यांत...

Nashik News : तृतीयपंथीयांत उभी फूट; वसूली, धर्मांतरण व गुरुआज्ञेवरून पोलीस ठाण्यांत गुन्हे

विभागणीमुळे व्यवसायावर परिणाम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर व जिल्ह्यात तृतीयपंथीय (किन्नर) समुदायातील विविध गटांमध्ये वर्चस्व, गुरुआज्ञा पाळणे, वसूली, मिळणाऱ्या पैशांचा हिशेब आणि धर्मांतरण आदी कारणांवरून अभूतपूर्व संघर्ष उफाळून आला आहे. या वादातून एकमेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप होत असून, थेट पोलीस ठाण्यांत (Police Station) परस्परविरोधी गुन्हे दाखल होत असल्याने नाशिकमधील तृतीयपंथीय समुदायात (Transgender Community) खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) दाखल गुन्ह्यानुसार, संशयित किन्नर अब्दुल जलालुद्दीन शेख (रा. कालिकानगर, मुंबई नाका, नाशिक) आणि त्याची गुरु सलमा (तृतीयपंथी) यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादी शुभम अर्जुन रिकामे (वय २५, रा, गजानन चौक, पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शेख याच्याशी सन २०२२ पासून ओळख होती. या ओळखीतून त्याने दोघांचे खासगी व ‘न्यूड’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. “धर्मांतर कर, नाहीतर १५ लाख रुपये दे,” अशी खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास व धर्मांतरण न केल्यास ‘तुझ्या घरच्यांना ठार मारेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आडगाव पोलीस ठाण्यातही (Aadgaon Police Station) तृतीयपंथीयांतील दुसऱ्या गटाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री नांदूर नाका येथील मांगीर बाबा चौकात फिर्यादी अनिकेत ऊर्फ डॉली वसंत म्हस्के (वय २१, रा. भालेराव मळा, नाशिक रोड) यांच्या तक्रारीवरून संशयित शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर शिंदे आणि सोनू घुगे (दोघेही रा. नांदूर नाका)यांच्याविरोधात गुन्हा नोंद आहे. “पैसे देणे बंद केलेस, तुला व्यवसाय करू देणार नाही,” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत संशयितांकडून हमीपत्र घेतल्याचे समजते.

यातून विभागणी व गुन्हे

शिंदे टोलनाका, सिन्नर व नाशिक शहरात वसूली कोण करणार, वर्चस्व कुणाचे, कलेक्शननंतर हिस्सा किती व कुणाला द्यायचा, गुरु कोणाला मानायचे व कुणाची आज्ञा पाळायची, यावरुन शेकडो किन्नर आणि गुरूंची विभागणी होऊन उभी फूट पडली आहे. सिन्नर, भद्रकाली, आडगाव, नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यांत यासंदर्भात परस्परविरोधी दहापेक्षा अधिक तक्रारी दाखल असून पोलिसांकडून समांतर तपास सुरू आहे. विशेष म्हणजे शुभांगी उर्फ सागर शिंदे, सोनू घुगे, सलमा गुरु, अनिकेत म्हस्के, अब्दुल शेख आदींचे गटतट निर्माण झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

गटतटाच्या पत्रपरिषदा, मोर्चा

सिन्नर येथील किन्नर सागर शिंदे व सोनू घुगे यांच्याविरोधात किन्नरांच्याच दुसऱ्या गटाने आडगाव पोलिसांत गुन्हा नोंदविला असून, रविवारी (दि. ८) किन्नरांच्या विविध दोन ते चार गटांनी शहरात पत्रपरिषदा व बैठका घेऊन आगामी पावित्र्याबद्दल चर्चा केली. तर, सागर शिंदेच्या समर्थनार्थ सोमवारी (दि. ९) सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व हिंदू किन्नर स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते. किन्नर आखाडाही वादात उतरला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणारे दोघे पकडले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. 11 जून रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरासमोर काहीतरी पडल्याचा...