Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल; संशयिताने बदनामीच्या धास्तीने...

Nashik Crime News : पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल; संशयिताने बदनामीच्या धास्तीने घेतला गळफास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर पोलीस (Satpur Police) विनयभंगाचा ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच संशयिताने (Suspected) उपनगर परिसरातील डी. जी. पी. नगरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश भिका गायकवाड (वय ४७, रा. सिल्व्हर बेल इंग्लिश शाळेजवळ, श्रमिकनगर, सातपूर) असे मृताचे नाव आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीत कार्यरत असलेल्या गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित गणेश गायकवाड यांच्याविरोधात गुरुवारी (दि. १६) सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जुलै रोजी सायंकाळी श्रमिकनगर भागात ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. पीडिता ही गायकवाड यांच्या मुलीकडे फोन मागण्यासाठी गेली असता, गायकवाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. अनेक वर्षे नामांकित कंपनीत काम करणाऱ्या गायकवाड यांना आपल्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच मानसिक धक्का बसला.

कायदेशीर कारवाई (Action) पोलीस ठाण्याची पायरी आणि समाजात होणाऱ्या संभाव्य बदनामीच्या धास्तीने ते तणावाखाली होते. यानंतर, त्यांनी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डी.जी.पी. नगर येथील नातेवाइकाच्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

तपासाअंती तथ्य समोर येणार?

या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळी पार्श्वभूमी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही गायकवाड कुटुंबाच्या परिचयाची होती. काही दिवसांपूर्वी एका कौटुंबिक किंवा समजुतीच्या कारणावरून गायकवाड यांनी तिला ज्येष्ठ या नात्याने सल्ला दिला होता. मात्र, या सल्लधाचा गैरसमज करून घेत काही घटकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. आता उपनगर आणि सातपूर पोलीस या आत्महत्येमागील मूळ कारणांचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या घटनेमागचे नेमके सत्य समोर येऊ शकणार आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...