Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : इंदिरानगरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; संशयित प्रियकरानेही...

Nashik Crime News : इंदिरानगरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; संशयित प्रियकरानेही गळफास घेऊन संपवले जीवन

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

शहरातील इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) वनसंपदा सोसायटी उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणीची (Woman) गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Police) वर्तवली होती. त्यानंतर आता या प्रकरणातील संशयित आरोपीनेही काही तासांतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मैत्रिणीसोबत बोलत असतानाच केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असून, ती मूळची अमळनेर येथील रहिवासी होती. ती नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील कानडे रो-हाऊस येथे पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहून आपले शिक्षण पूर्ण करत होती. शुक्रवारी रात्री वैष्णवी तिच्या मैत्रिणीसोबत वनसंपदा सोसायटीच्या उद्यानात बसलेली असताना, संशयित तरुण तिथे आला. त्याने वैष्णवीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला प्रतिसाद देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने संशयिताने अचानक खिशातून चाकू काढला आणि वैष्णवीच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेली वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली.

परिसरात धावपळ, पोलिसांची घटनास्थळी धाव

दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिक घराबाहेर आले. रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणीला पाहून त्यांनी तत्काळ इंदिरानगर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत वैष्णवीचा मृत्यू (Death) झाला होता. तिच्या गळ्यात चाकू खुपसलेल्या अवस्थेतच मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू घटनास्थळावरून जप्त केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी गोपाल धरमदास बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

संशयित प्रियकराचीही आत्महत्या

वैष्णवीची हत्या केल्यानंतर पसार झालेल्या संशयित आरोपीनेही टोकाचे पाऊल उचलले. साहिल अशोक लाव्हारे असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने आज (शनिवारी) पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात एका झाडाला लटकून गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस दिली आहे. एकाच रात्री घडलेल्या या हत्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर भागात घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...