Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News : एपीके फाईल ठरतेय सायबर हत्यार; दाेघांचे माेबाईल, बँक...

Nashik Crime News : एपीके फाईल ठरतेय सायबर हत्यार; दाेघांचे माेबाईल, बँक खाते हॅक करुन लाटले १४ लाख

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

डिजिटल अरेस्ट, फॉरेक्स ट्रेडिंग, बिटक्वाइन आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या सायबर चाेरट्यांनी (Cyber Theives) आता आपले लक्ष्य बदलले असून एपीके फाईल अर्थात अँन्ड्राइड पॅकेज किट या नवीन डिजिटल हत्याराचा वापर सुरू केला आहे. मोबाईल, व्हॉट्सॲप आणि बँक खाती हॅक करून नागरिकांसह (Citizen) सेवानिवृत्तांची आयुष्याची पुंजी लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच गंभीर बाब म्हणजे नाशिकसह राज्यात सायबर गुन्ह्यांतील रिकव्हरी आणि गुन्हे उकलीचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजेच ‘नाही’च्या बरोबरीने असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -

​असाच एक गंभीर प्रकार नाशिकमधील कामटवाडा परिसरात उघडकीस आला असून, अज्ञात सायबर चाेरट्यांनी दाेन कुटुंबाना व्हाट्स अॅपवर एपीके फाईल पाठवून तब्बल १४ लाख ४९ हजार ९८२ रुपयांचा गंडा घातला आहे. शहर सायबर पोलिसांतील नोंद गुन्ह्यानुसार, कामटवाडा येथील अभियंता नगर परिसरात ०२ जून ते ०७ जून २०२६ या कालावधीत ही घटना घडली. चाेरट्यांनी फिर्यादी व साक्षीदारास जाळ्यात ओढून त्यांच्या मोबाईलवर एक घातक ‘एपीके’ फाईल पाठवली. फिर्यादीने ही फाईल डाऊनलोड करताच, संशयित प्रदीप (मोबाईल क्र. 8420953533) आणि त्याच्या अज्ञात साथीदारांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवला.

चाेरट्यांनी दोन टप्प्यांत अनुक्रमे आठ लाख ३६ हजार व सहा लाख तेरा हजार असे एकूण १४ लाख ४९ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६, ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे करत आहेत.

​एपीके फाईल म्हणजे काय आणि ती कशी काम करते?

​अनेकदा सायबर चोरटे व्हॉट्सॲप, मेसेज किंवा सोशल मीडियावरून लाइट बिल भरणे, क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स, बँक केवायसी अपडेट किंवा पार्सल ट्रॅकिंगच्या नावाखाली इंग्रजीत एपीके नाव असलेल्या फॉरमॅटमधील फाईल/लिंक पाठवतात. नागरिकांनी या लिंकवर क्लिक करून ॲप इन्स्टॉल केल्यासलमोबाईलचा पूर्ण ॲक्सेस चाेरट्यांच्या हाती जातो.लबँक खात्याशी संबंधित येणारे ओटीपी (आणि मेसेज चाेरट्यांनी परस्पर वाचता येतात. मोबाईलमधील पासवर्ड, बँक डिटेल्स आणि सर्व वैयक्तिक माहिती चोरीला जाते.

सायबरचे अपयश

​मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर परिसरात दररोज लाखाे काेटी रुपयांची सायबर फसवणूक होत असताना सायबर तपासात मात्र हातावर शून्यच येत आहे. तांत्रिक अडचणी आणि आंतरराज्यीय/आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा सहभाग, सर्व्हर ट्रँकिंगमधील अपयश यामुळे रिकव्हरीचे प्रमाण नगण्य आहे. गुन्ह्यांची उकल होत नसल्यानेच सायबर चाेरटे बिनधास्तपणे नागरिकांचे बँक खाते रिकामे करत आहेत.

​नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

​- अज्ञात एपीके फाईल डाऊनलोड करू नका.
​- सुरक्षित सोर्स वापरा, काेणतेही ॲप डाऊनलोड करताना प्ले स्टाेअर व ॲपल ॲप स्टाेअरचा वापर करा.
– ॲप इन्स्टॉल करताना मोबाईलमधील एसएमएस, कॉन्टॅक्ट्स किंवा कॅमेऱ्याची परमिशन देऊ नका.
– फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘या’ तारखेपर्यंत VIP दर्शन बंद;...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar सध्या पितृपक्ष चालू असल्याने या काळात राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे पितृकर्म व धार्मिक विधींसाठी येतात. शनिवार-रविवार...