Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमNashik Crime News : "माझी माणसं सर्वत्र पसरलेली, पंधरा मिनिटांत तुझा..."; सुमित...

Nashik Crime News : “माझी माणसं सर्वत्र पसरलेली, पंधरा मिनिटांत तुझा…”; सुमित पगारे हत्याकांड प्रकरणातील संशयिताकडून कुटुंबाला धमकी

ऑडिओ क्लिपसह पोलिसांत तक्रार

नाशिक रोड | Nashik Road

येथील गोसावीवाडी परिसरातील चर्चित सुमित पगारे हत्याकांडाला (Summit Pagare Murder Case) दोन महिने उलटून गेले तरीही हे प्रकरण शांत होण्याऐवजी पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणातील संशयित व सराईत गुन्हेगार राजू शेख याने पगारे कुटुंबीयांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने या प्रकरणाला आता नवे गंभीर वळण मिळाले आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची (NC) नोंद केली आहे.

- Advertisement -

पगारे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडातील प्रमुख संशयित राजू शेख, रईस उर्फ पापा शेख आणि जमीर रंगरेज यांच्यासह काही संशयित (Suspected) अद्याप फरार असून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. यातच संशयित राजू शेख याने सुमित पगारे यांचे आत्येभाऊ सागर उर्फ बंटी मोरे यांना फोनवरून (Phone) धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

१५ मिनिटांत मर्डर करू आणि पोलिसांना मॅनेज केले आहे

कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, फोनवरील संभाषणात “माझ्या विरोधात मोर्चा काढलात तर सर्वांना जीवे ठार मारू, माझी माणसं सर्वत्र पसरलेली आहेत, पंधरा मिनिटांत तुझा मर्डर होईल” असा थेट इशारा देण्यात आला. एवढेच नव्हे तर या केसमध्ये पोलिसांना मॅनेज केले आहे, त्यामुळे मला कोणीही पकडू शकत नाही असा दावाही संशयिताने केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह नाशिकरोड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

पोलीस संरक्षणाची व निष्पक्ष चौकशीची मागणी

या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता अजून अधिकृतपणे सिद्ध झालेली नसली तरी, फोन रेकॉर्डिंग, कॉल डिटेल्स (CDR) आणि इतर तांत्रिक पुराव्यांची सखोल कायदेशीर पडताळणी करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. मृत सुमित पगारे यांची पत्नी काजल पगारे, रुचिका पगारे व इतर कुटुंबीयांनी “सुमितला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि फरार आरोपींकडून आमच्या जिवाला मोठा धोका असल्याने आम्हाला त्वरित पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे,” अशी आक्रमक मागणी केली आहे. या गंभीर तक्रारीनंतर आता नाशिकरोड पोलीस फरार आरोपींना तात्काळ अटक करून पुढे कोणती कडक कारवाई करतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

चोक्कलिंगम

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र, ECINetमध्ये ‘या’ बदलांची मागणी

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची...