Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime News : आधी सॉरी बोल, मगच जा! खुनशी नजरेने का...

Nashik Crime News : आधी सॉरी बोल, मगच जा! खुनशी नजरेने का पाहतोय म्हणत तरुणाला भररस्त्यात मारहाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

“तू आमच्याकडे खुनशी नजरेने का पाहतोस? तुला माहीत आहे का आम्ही येथील भाई लोक आहोत? आधी सॉरी बोल, मगच इथून जा!” अशी थेट धमकी देत तीन अज्ञात गुंडांनी एका तरुणाला भररस्त्यात धारदार हत्याराने (Sharp Weapon) आणि हेल्मेटने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-पुणे हायवे रोडवरील (Nashik-Pune Highway) एका चायनीजच्या हातगाड्यासमोर ही घटना घडली असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिलिंद रघुनाथ मोंढे (३६, रा. यशोदा हौसिंग सोसायटी, बजरंगवाडी, नाशिक) हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी (दि. २२) रात्री ९:५० च्या सुमारास ते नाशिक -पुणेरोडवरील विजय-ममता सिग्नलसमोरील एका चायनीजच्या हातगाड्यावर चिकन राईस घेण्यासाठी गेले होते. तिथून जेवण घेऊन ते मोटारसायकलवरून घरी परतत असताना, एचडीएफसी बँक आणि धुंदाई शोरूमजवळ एका अॅक्टिव्हा स्कूटरवरून तीन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले.

या तिघांनी मिलिंद यांना विनाकारण अडवून ‘खुनशी नजरेने का पाहतोस’ अशी विचारणा केली. आपण या भागातील भाई असल्याचा आव आणत त्यांनी मिलिंद यांना बळजबरीने माफी मागण्यास सांगितले. मिलिंद काही समजण्याच्या आतच त्यातील एकाने आपल्या हातातील धारदार हत्याराने मिलिंद यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागावर जोरदार वार केला. तेवढचात दुसऱ्या संशयिताने मिलिंद यांच्या हातातील हेल्मेट हिसकावून घेतले आणि त्याच हेल्मेटने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांना भररस्त्यात अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

भाईगिरीमुळे संताप

अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मिलिंद मोंढे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. मिलिंद यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी तीन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या भाईगिरी करणाऱ्या गुंडांचा शोध घेतला जात आहे. शहर परिसरात वाढत्या अशा रोडरोमिओ आणि भाईगिरी करणाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘आरोग्यवर्धिनी’वर सहा लाख नाशिककरांचा विश्वास; ओपीडीत तपासणी, शहरात...

0
नाशिक | फारूक पठाण | Nashik सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि घराजवळच दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर (Arogyavardhini...