Thursday, April 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुणाची चॉपरने हत्या

Nashik Crime News : सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुणाची चॉपरने हत्या

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

क्षुल्लक कारणावरून वाढलेल्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील पेठरोड परिसरात (Peth Road Area) घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या रागातून संशयित आरोपीने चॉपरने हल्ला (Attack) करत तरुणाचा जीव घेतला. राहुल कृष्णा राऊत (वय २७, रा. नवनाथ नगर, पेठ रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Water News : जिल्ह्यात धरणसाठ्यात घट; पाणीटंचाई तीव्र, टँकरची मागणी वाढली

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास राहुल राऊत हा टिल्लू पवार व सुनील गुंजाळ या मित्रांसह नवनाथ नगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ बसला होता. यावेळी रोहिदास वामनराव आहेर (वय २६, रा. नवनाथ नगर) हा तेथे आला व त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र राहुलने नकार दिल्याने संतापलेल्या आहेरने आपल्या जवळील चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सोमवारी (दि. २०) पहाटे दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू (Death) झाला. मयताचे वडील कृष्णा हरी राऊत यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिककर तणावमुक्त होणार; हैदराबादच्या धर्तीवर साकारणार अत्याधुनिक ध्यान केंद्र

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार करत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.सध्या परिसरात तणाव नसून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सराईत आरोपीचा शोध सुरू

हल्ला करणारा रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडी, मारामारी आणि दहशत निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : पाच वाजेपर्यंत ‘एवढे’ टक्के मतदान

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri बहुचर्चित राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Rahuri Assembly By Election) आज गुरुवारी (23 एप्रिल) मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणीही माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्याविषयीची संदिग्धता...