Saturday, May 9, 2026
HomeनाशिकNashik Crime : दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद; एकाचा खून

Nashik Crime : दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद; एकाचा खून

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

दारूच्या नशेत दोघांमधील वादात एकाने ५० वर्षीय व्यक्तीच्या (Person) डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करुन खून (Murder) केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील दत्त मंदिर चौक येथे घडली आहे. दत्त मंदिर चौक येथील देशी दारूच्या बार बाहेर ही घटना घडली असून, गणपत गारे असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

आज मंगळवार (दि.८) जुलै रोजी सकाळी पावणे बारा वाजेच्या दरम्यान दत्त मंदिर चौक येथील देशी बारच्या बाहेर संशयित सरमोद कोल (मूळ रा. सतना मध्यप्रदेश) त्याच्यात व मयत गणपत चंदर गारे या दोघांमध्ये दारू पिल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद (Dispute) झाला. यावेळी मयत गणपत यांनी सरमोद याला सर्वप्रथम लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर सरमोद याने त्या लाकडी दांडक्याचा ताबा मिळवत गणपत यांच्या डोक्यात तीव्र हल्ला चढवला. या हल्ल्यात गणपत गारे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच कोसळले.

दरम्यान. यानंतर गणपत यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेवेळी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे (Crime) शोध पथक गस्तीवर असताना त्यांनी संशयित सरमोद याला ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. तर गणपत व सरमोद यांच्यामध्ये वाद कशावरून झाले याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

ताज्या बातम्या