Friday, August 21, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं; इंदिरानगर परिसरात एकाची हत्या

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं; इंदिरानगर परिसरात एकाची हत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सातपूर (Satpur) येथील श्रमिकनगर परिसरातील (Shramiknagar) पार्थ पॅलेसच्या शंभर फूटी रस्त्यालगत बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून २२ वर्षीय युवकाची (Youth) टोळक्याने हत्या केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाचा आता पुन्हा एकदा भरदिवसा इंदिरानगर हद्दीत खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राशीद हारून शेख असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) सेल पेट्रोल पंपाच्या मागे ही घटना घडली आहे. सदर मयत व्यक्ती व संशयित आरोपी अंबड परिसरातील आहे. मयत व्यक्ती वाढदिवसाचे बुकिंग करण्यासाठी आला असता मागील वैमनस्यातून ही घटना घडल्याचे समजते.

दरम्यान, बुधवारी रात्रीच एक खुनाची घटना घडलेली असताना पुन्हा एकदा गुरुवारी दुपारी खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील (Nashik City) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...