Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik Crime : धारदार शस्त्राने वार करून एकाला संपवलं; आठवड्याभरातील तिसरी घटना

Nashik Crime : धारदार शस्त्राने वार करून एकाला संपवलं; आठवड्याभरातील तिसरी घटना

संशयित ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अनोळखी संशयितांसह काही विधिसंघर्षितांनी क्षुल्लक कारणातून धारदार शस्त्राने वार करून फिरस्त्या व्यक्तीचा खून (Murder) केल्याची घटना शनिवारी (दि. २७) रोजी मुंबई नाका परिसरात (Mumbai Naka Area) घडली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये दोन जणांची हत्या झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, बंडू गांगुर्डे (वय ४३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बंडू हे मुंबई नाका परिसरातील महामार्गाच्या (Highway) उड्डाणपुलाखाली होते. त्यावेळी अनोळखी संशयितांनी त्यांच्यावर शनिवारी हल्ला केला. यानंतर त्यांना उपचारार्थ रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला.

दरम्यान, मयत बंडूच्या छातीवर पाचहून अधिक गुप्ती किंवा चाकूचे वार करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. गांगुर्डे यांच्याशी परिचितांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करुन संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर सीसीटीव्ही फूटेजनुसार काही विधिसंघर्षितांसह संशयितांना (Suspected) ताब्यात घेतल्याचे कळते. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...