पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
गणेशवाडीतील (Ganeshwadi) आयुर्वेदिक सेवा संघ संचलित औषधी भवन येथील स्टोअर रूम मधील औषधी बॉटलचे अल्युमिनियमची झाकणांचे बॉक्स चोरणाऱ्या तीन चोरट्यांना (Thieves) जेरबंद करण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास (Panchavati Crime Branch Tean) यश मिळाले आहे. या संशयितांकडून औषधी बॉटलचे आठ बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस हवालदार एम टी नांदुर्डीकर करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशवाडीत आयुर्वेदिक सेवा संघ संचलित औषधी भवन विद्यालय व रुग्णालय (Hospital) आहे. बुधवार (दि.११) रोजी सायंकाळी सहा ते गुरुवार (ता.१२) रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान औषधी भवन येथील स्टोअर रूममधील औषधी बॉटलचे आठ बॉक्स चोरीस गेले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पंचवटी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी सदर गुन्ह्याची तपास करीत होते.
पोलिस अंमलदार कुणाल पचलोरे यांना या गुन्ह्यातील संशयित गणेशवाडीतील मुंजोबा चौकात येणार असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) सापळा रचून मयुर राजाराम जाधव (वय ३० रा. रो हाऊस नं-१६, साई रो हाऊस हिरावाडी, पाटाजवळ, पंचवटी, नाशिक), जितेष उर्फ गुड्डु चिंतामण फसाळे (वय २१ रा. ठि. गणेशवाडी मुंजाबा चौक, पंचवटी नाशिक), संदिप छोटुलाल कनोजिया (वय-२५, रा. ठि. गणेशवाडी मुंजाबा चौक, पंचवटी नाशिक) या तिघांना ताब्यात घेतले. यांना पोलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली. या संशयितांकडून चोरीस गेलेले आठ बॉक्स हस्तगत करण्यात आले.
दरम्यान, सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त संगिता निकम, पंचवटी पोलिस ठाण्याचे (Panchavati Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश शिरसाठ सहायक पोलिस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलिस हवालदार कैलास शिंदे,महेश नांदुर्डीकर, काळे, पोलिस नाईक जयवंत लोणारे, पोलिस अंमलदार गायकवाड, कुणाल पचलोरे, अंकुश काळे, वैभव परदेशी, बहिकर, वायंकडे, चितळकर, पवार, महिला पोलिस अंमलदार शिंदे यांनी पार पाडली.




