Saturday, May 9, 2026
Homeक्राईमNashik Crime : टोळीयुद्धाचा मास्टरमाईंड जाळ्यात; मित्राला भेटण्यासाठी आलेला सराईत डिंगम गावठी...

Nashik Crime : टोळीयुद्धाचा मास्टरमाईंड जाळ्यात; मित्राला भेटण्यासाठी आलेला सराईत डिंगम गावठी कट्ट्यासह ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोडच्या (Nashik Road) फर्नांडिसवाडीत हप्तावसुली तसेच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भर चौकात गोळीबार (Firing) करून गेल्या अडीच महिन्यांपासून पसार असलेला बेद गँगचा कट्टर समर्थक रोहित गोविंद डिंगम ऊर्फ माले याला नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) गोरेवाडीतून गजाआड केले. पसार असताना शुक्र वारी (दि.१९) गावठी पिस्तुलानिशी मित्राला भेटण्यासाठी आला असता नाशिकरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. माले ऊर्फ डिंगमवर विनयभंग, खून, खुनाच्या प्रयत्नाचे सहा गुन्हे नोंद आहेत. त्याचा ताबा उपनगर पोलिसांकडे सोपवला जाणार आहे.

- Advertisement -

जयभवानी रोडवरील बेद व उज्जैनवाल टोळीत गेल्या बारा वर्षांपासून वाद आहेत. या टोळ्यांतील सराईत, त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे उपनगर, नाशिकरोड, मालधक्का रोड, बिटको, फर्नांडिसवाडी, जयभवानी रोडसह इतर भागात खंडणी आणि हप्तेवसुली करतात. त्यामुळे दोन्ही टोळ्यांच्या भाईगिरीला स्थानिक नागरिक व व्यावसायिक वैतागले असून कठोर कारवाया करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. नागरिक व व्यावसायिक वैतागले असून कठोर कारवाया करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही टोळ्यांचे सदस्य पूर्वीश्रमीच्या काही गुन्ह्यांत जामिनावर आहेत. त्यातच १९ जुलै रोजी रात्री दोन वाजता दोन्ही टोळ्यांनी फर्नांडिसवाडीत एकमेकांवर गावठी कट्ट्यांतून गोळीबार केला होता. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नव्हती.

पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटांतील संशयित टक्या ऊर्फ सनी रावसाहेब पगारे, इर्शाद चौधरी, बारक्या ऊर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाठे, राहुल उज्जैनवाल, रोहित गोविंद डिंगम ऊर्फ माले व दोन्ही गटातील दहा अनोळखी संशयित (सर्व रा. फर्नांडिसवाडी, उपनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि काही संशयितांना गजाआड केले होते. मात्र, बेद गँगचा समर्थक माले हा १९ जुलैपासून पसार होता. त्याचा शोध सुरू असतानाच १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तो गोरेवाडीतील मनपा शाळेसमोर मित्रास भेटण्यासाठी आल्याची माहिती पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. दरम्यान, याबाबत नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याच्या तपासानंतर त्याचा ताबा उपनगर पोलिसांकडे (Upnagar Police) दिला जाणार आहे.

राहुलचे वकीलपत्र घेणाऱ्या वकिलाचे घर फोडले

जुलैमध्ये संशयित राहुल उज्जैनवाल याचे नेहमीच वकीलपत्र घेणाऱ्या त्याच्या काकू अॅड. जसलीन चहल यांच्या घरावर बेद गँगचा सदस्य रोहित डिंगम ऊर्फ माले याने व साथीदारांनी मध्यरात्री दगडफेक करून नुकसान केले. घरावर मद्याच्या बाटल्या फेकल्या. त्यामुळे परिसरात भीती पसरली होती. बेद व उज्जैनवाल टोळी बाहेर आल्याने पोलिसांसह सामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. भर चौकात दोन टोळ्या एकत्र येऊन गोळीबार करत असल्याने पोलिसांचा धाक संपुष्टात आल्यासह पेट्रोलिंग, रात्र गस्त व स्टॉप अॅण्ड सर्च कारवाया फोल ठरल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

दृष्टिक्षेपात

  • माले, उज्जैनवाल व बेद गँगचे वैर वाढले
  • काही महिन्यांपूर्वीच दोन्ही टोळ्यांवर मोक्काची कारवाई
  • मयूर बेद व टोळीचा मोक्का फिस्कटला
  • फेब्रुवारी २०२४ मध्ये बरखा उज्जैनवालवर गोळीबार
  • दोन्ही टोळ्यांवर अनुक्रमे २२ गुन्हे

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...