Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी गणेश गितेंची वर्णी;...

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी गणेश गितेंची वर्णी; माजी आमदाराची सदस्यपदी निवड

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Nashik Agricultural Produce Market Committee) अखेर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, अध्यक्षपदी गणेश गीते (Ganesh Gite) यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पणन संचालनालयाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्हा बाजार समितीचे २१ जुलै २०२६ रोजी विभाजन होऊन नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ अशा तीन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या. या विभाजनानंतर नाशिक बाजार समितीवर प्रशासक कार्यरत होते. पणन संचालनालयाने (Directorate of Marketing) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १५(अ) मधील तरतुदींनुसार यापूर्वीच्या प्रशासकाऐवजी अशासकीय प्रशासक मंडळाला मान्यता दिली आहे.

दरम्यान, हे अशासकीय प्रशासक मंडळ (Non-official Board of Administrators) पुढील ६ महिने किंवा नाशिक बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी कामकाज पाहणार आहे. या आदेशानुसार (Order) पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.

अशासकीय प्रशासक मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी
१. गणेश बबन गीते – अध्यक्ष
२. बाळासाहेब महादु सानप सदस्य
३. सचिन भास्कर ढिकले सदस्य
४. बापू विश्वनाथ पिंगळे सदस्य

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारच्या आदेशानंतरही बँका व फायनान्स कंपन्यांकडून शेतकर्‍यांना वसुलीसाठी त्रास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar केंद्र सरकारकडे राज्य सरकारने दुष्काळी मदतीची मागणी करूनही अद्याप मदत मिळालेली नाही. केंद्राकडून मदत मिळण्यास विलंब का होत आहे? राज्य सरकारचे केंद्रात...