नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टिप्पर गंगचा सूत्रधार व नाशिकमधील (Nashik) कार डेकॉर व्यावसायिक निखिल दर्यानानी यांच्या अपहरण (Kidnapping) प्रकरणाचा मास्टरमाईंड मोव पाण उर्फ शाकीर नासीर पठाण याला तीन महिन्यानंतर पकडण्यात गुंडाविरोधी पथकास यश आले आहे. फरार असताना संशयित पठाण याने थेट पत्नीला (Wife) सोबत घेऊन ‘भारतभ्रमण’ केल्याचे उघड झाले असून पुढील काही दिवसांत तो पुन्हा एका अपरहणासह खंडणीचा गुन्हा करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे येत आहे.
दरम्यान दर्यानानी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून त्यानंतर मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. त्याचा सख्खा भाऊ छोटा पठाण तुरुंगात आहे. ४ एप्रिल २०२५ मध्ये काठे गल्ली (Kathe Galli) सिग्नलवरून व्यावसायिकाचे अपहरण केल्यावर टिप्पर गंगने गोळीबाराच्या धाकावर एक कोटी रुपये मागून पंधरा लाख रुपयांची खंडगी उकळली होती. या प्रकरणात टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण, प्रणव बोरसे उर्फ मोहम्मद आमीन बोरसेसह आठ जणांवर मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात पोलिसांनी काही संशयितांना (Suspected) अटक करुन गुन्ह्याची उकल केली होती.
यानंतर याच गुन्ह्यात टिप्पर गँगमधील संशयित मोहम्मद अन्वर सय्यद वय ३०), सादिक लतीफ सय्यद (क्य ३९), अहमद उर्फ एजाज रहिंग शेख (वय २५), अलफरान अश्पाक शेख (वय २५), समीर नासीर पठाण (वय ३४), गुफरान अय्यूच तांबोळी (वय ३७), प्रणव बोरसे उर्फ मोहमंद आमीन तुकाराम बोरसे (वय ३४) आणि शाकीर नासीर पठाण (वय ३६, सर्व रा. वडाळागाव) यांच्यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी १० जुलै रोजी मोक्षान्वये कारवाई केली आहे. या अपहरण व गोळीबार (Firing) कांडाचा सूत्रधार मोठा पठाण ४ एप्रिलपासून पसार होता. त्याचे लोकेशन मिळत नसल्याने सर्वच पथके त्याच्या मागावर असतानाच, गुंडाविरोधी पथकास त्याच्या वेगवेगळ्या लोकेशनची माहिती मिळाली.
दरम्यान, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने मागील महिनाभरापासून परभणी, छ. संभाजीनगर, बुलढाणा, कोकण किनारपट्टी गाठून त्याचा शोध घेतला. मात्र, सतत लोकेशन बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही. त्यातच तो दोन मोबाईलवरुन संभाजीनगरातील काही मित्रांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळताच पथक रवाना झाले. तेव्हा पठाण परभणीमार्गे बुलढाणा येथील मस्जिदीजवळील लाॉजिंगवर असल्याचे कळाले. यानंतर पथकाने त्याला गजाआड केले.
बारा लाखांतून शिल्लक ३१ हजार रुपये
दर्यानानी यांच्या भावाकडून १५ लाख रुपये घेताच, पठाणने साथीदारांना तीन लाख रुपये देत बोळवण केली व उर्वरित बारा लाख रुपये घेऊन पोबारा केला. यानंतर त्याने पत्नीशी अतिशय सावधपूर्वक संपर्क करून तिला सोबत घेऊन कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र, हैद्राबाद, जम्मू काश्मीर, उटी आदी ठिकाणे गाठून पर्यटन केले. गेल्या तीन महिन्यात पठाणने पर्यटन, जेवण, वास्तव्यासाठी ११ लाख ६९ हजार रुपये खर्च केले आहेत. त्याच्याकडे दोन मोबाईल, ३१ हजार रुपये आढळले आहेत. घातक हत्यारे आढळलेली नाहीत.
असा आला जाळ्यात, पळण्याचा प्रयत्न
दयानानी याचे अपहरण करताना पठाण प्लान्झा कारमधून स्वतः सहभागी होता. त्याने सातारा पासिंगची ठेयोटा ग्लान्झा कार एका व्यवहारातून ताब्यात घेत वापर केला. याच कारच्या माध्यमातून तो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरला. दरम्यान, बुलढाणा येथील फायनल लोकेशन मिळताच पथक पोहोचले. त्यांना मस्जिदीजवळील मोकळ्या जागेत असलेल्या शेडनेटमध्ये ग्लान्झा (एमएच ११ डीडी २१०१) कार दिसली. तेव्हा पठाणला पोलीस आल्याचे समजताच त्याने पळ काढला. पथकाने पकडल्यानंतर त्याने त्याची ओळख अमित सांगितली. पण चौकशी तो हादरल्याने त्याने गाडीसह इतर माहिती दिली.
ठळक मुद्दे
- पठणची पत्नी सात-आठ दिवसाआड नाशिकमध्ये येत-जात होती.
- त्यामुळे कुणालाही संशय नाही.
- पठाणला बारा वर्षांचा मुलगा असून तो शिक्षण घेतो.
- हिंदूधर्मीय महिलेशी विवाह.
- पठाणसोबत असल्याने तिने दोन महिन्यांपासून घरी ठेवला मोबाईल.
- पठाण दाम्पत्यासह पर्यटनास इतर दोघे असण्याचा संशय,
- ग्लान्झा कारचा नंबर चिखलामुळे अस्पष्ट झाल्याने अडथळा.
- दर्यानानी यांनी स्वतःची सुटका केल्याने अनर्थ टळला होता.
- एक कोटी मिळाले असतेच तर गुन्हा उघड होण्याची शक्यता कमी होत.
- संशयित मोहमंद सैय्यद याच्यावर सात तर, शाकीरवर १९ गुन्हे
- पखाल रोड दंगलीत छोटा व मोठा पठाणचा सहभाग.




