नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात (City) दुचाकी चोरी करून गेल्या पाच वर्षांपासून फारारी असलेल्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दाेनच्या पथकाने नैताळे (ता. निफाड, जि. नाशिक) सापळा रचून अटक (Arrested) केली. गणेश सुरेश पिंपळे (वय ३०, रा. तास दिंडोरी, शिवरेफाटा, ता. निफाड, जि. नाशिक) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
नाशिक शहर पोलीस (Nashik City Police) गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या संशयितांचा शोध घेतला आहे. युनिट दाेनच्या पथकास पिंपळे हा निफाड तालुक्यातील नैताळे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, पोलिसांनी त्यास नाशिक शहरात आणून वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलिसांच्या (Nashik Road Police) ताब्यात दिले. युनिट दाेनचे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, सहायक उपनिरीक्षक संजय सानप, हवालदार मनोहर शिंदे आदींनी ही कारवाई केली.




