Saturday, May 30, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : खरातच्या जीवाला धोका; SIT चे न्यायालयाला पत्र, आजच्या...

Ashok Kharat Crime : खरातच्या जीवाला धोका; SIT चे न्यायालयाला पत्र, आजच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं?

नाशिक | Nashik

- Advertisement -

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्वयंघोषित कॅप्टन ऊर्फ भोंदू अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. मात्र, दिल्लीतील पीडितेचा गर्भपात केल्याच्या दाखल दुसऱ्या गंभीर गुन्यात पुन्हा त्याचा ताबा घेतला व अटक केली. यानंतर आज (गुरुवारी) त्याला न्यायालयात हजर केले असता नाशिक सत्र न्यायालयाने खरातला बुधवार (दि.८ एप्रिल) पर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातचा पाय खोलात; दुसऱ्या गुन्ह्यात बेड्या, आज कोर्टात हजर करणार

अशोक खरातला आज (गुरुवारी) सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयात (Court) प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले. एसआयटीने खरातच्या जीवाला धोका असल्याचे पत्र न्यायालयाला दिले. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने त्याला आज ऑनलाइन हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने महिलेवर अत्याचार आणि गर्भपाताच्या गुन्ह्यात त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी न्यायालयाच्या रूममध्ये चार मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. यात संशयित आरोपी खरात, न्यायाधीश आणि न्यायालयातील कामकाज एकमेकांना दिसत होते.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातने मिरगावचा विकास निधी ईशान्येश्वर मंदिराकडे कसा वळवला? नगराध्यक्ष, नगरसेवकांनी केला भांडाफोड

न्यायालयात आज नेमकं काय घडलं?

आज सुनावणी सुरु झाल्यावर न्यायाधीश बी.एन.ईचपुरानी यांनी त्याला नाव विचारले. यावेळी आवाज कमी येत असल्याने न्यायाधीशांनी त्याला मोठ्याने बोलण्यास सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी खरातला “तुमचे वकील म्हणून भाटे इथे बाजू मांडत आहेत, ते तुमचे वकील आहेत का?” असा सवाल केला. त्यावर अशोक खरातने “हो” असे उत्तर दिले. त्यानंतर सुनावणीच्या शेवटी न्यायाधीशांनी खरातला “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” असे विचारले. यावर त्याने हात जोडून “काही नाही” असे म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू खरात प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत; महिला IAS अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर

सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला?

आजच्या सुनावणीवेळी सरकारी वकिल ॲड. शैलेंद्र बागडे यांनी “खरातने आमिष दाखवून पिडितेवर अत्याचार केला, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने तिला काही गोळ्या आणि एक औषध देऊन तिचा गर्भपात केला. या गोळ्या कुठून आणल्या आणि त्या औषधात नेमकं काय होते? याचा तपास करायचा बाकी आहे. तसेच खरात पिडितेला “तू अप्सरा आहेस” असे सांगून भुरळ घालत तिचे शोषण करीत होता. याशिवाय पिडितेच्या नातेवाईकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. यामागे त्यांची संपत्ती बळकवण्याचा कट होता का? याचा तपास एसआयटी करत आहे. त्यामुळे तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे” असा युक्तिवाद त्यांनी केला.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

खरातचे वकील काय म्हणाले?

तर खरातचे वकील भाटे म्हणाले की,”हा आरोपीचा दुसरा गुन्हा असून, यापूर्वी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी झालेली आहे. अद्याप त्यांच्याकडे फिर्याद प्रत आलेली नाही. दुसऱ्या गुन्ह्यात गर्भपात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचा कालावधी किती होता? हे समोर आलेले नाही. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...