Monday, April 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून जप्त केले ३०० किलो गोमांस;...

Nashik Crime : पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून जप्त केले ३०० किलो गोमांस; सहा जण ताब्यात, बेकायदेशीर गाळे जमीनदोस्त

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

परिसरातील ईएसआय रुग्णालयालगत (ESI Hospital) असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. यानंतर सातपूर पोलिसांनी (Satpur Police) तात्काळ धाड टाकून सुमारे ३०० किलो मांस जप्त केले. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी धडक कारवाई करत परिसरातील सहा बेकायदेशीर गाळे जमीनदोस्त केले. तर महापौर हिमगौरी आडके यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

- Advertisement -

सातपूर-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्यावरील (Satpur-Trimbak Road) इएसआय रुग्णालयाच्या भिंतीलगत, स्वच्छतागृहा शेजारी गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे समोर आली. शेजारीच संतोषी माता देवीचे मंदिर असल्याने स्थानिकांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवत कारवाईची मागणी केली. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. काही काळ वातावरण तणावपूर्ण होते.

तसेच याप्रकरणी शेख हुसेन शेख गुरु, तौफिक इब्राहिम कुरेशी, फारुख अब्दुल रेहमान कुरेशी, हुसेन अफरोज कुरेशी, शकील कुरेशी आणि अफरोज कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून जप्त मांसाची वैद्यकीय व कायदेशीर तपासणी प्रक्रिया राबवली जात आहे.

दरम्यान, परिसरातील रहिवाशांनी (Citizen) महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणाचा परवाना, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने नमुने तपासून आवश्यक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सातपूर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. चार पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर पोलीस ठाण्याचे सहा उपनिरीक्षक तसेच सुमारे ४० ते ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : संगमनेरात 8 लाख 68 हजाराचे गोमांस जप्त

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरामध्ये कत्तलखाने (Slaughterhouses) उध्वस्त केल्यानंतर पुन्हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) रविवारी (दि.5) भारतनगर परिसरात छापा (Raid) टाकून 8...