Sunday, May 10, 2026
HomeनाशिकNashik Crime : ऐन दिवाळीत होणार चोरट्यांचा 'बंदोबस्त'

Nashik Crime : ऐन दिवाळीत होणार चोरट्यांचा ‘बंदोबस्त’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवाळीत (Diwali) गावी जाणाऱ्यांसह भाऊबीजेनिमित्त माहेरी जाणाऱ्या महिलांमुळे बसेस व रेल्वेला अधिक गर्दी असल्याने पोलिसांनी (Police) तिथे अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. साध्या वेशातल्या पोलिसांसह गस्ती पथकांना चोरट्यांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांनाही खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत.

- Advertisement -

शहरातून जिल्ह्यात (District) व परजिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्यांसह उपनगरांतील मुख्य चौकात पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली आहे. गर्दीच्या ठिकाणी बॅरकेडिंग करुन ठक्कर बाजार, महामार्ग बस स्थानकासह नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसांची पथकेही नेमण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, निर्भया पथकांसह दामिनी बीटमार्शल्सची गस्त सुरू आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या खिशातील पैसे, दागिने लंपास होत असल्याच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी सीसीटीव्हीसह साध्या वेशातल्या अंमलदारांमार्फत गस्त सुरू आहे.

मात्र, नागरिकांनीही (Citizen) सतर्क रहावे तसेच संशयास्पद हालचाली वाटल्यास नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, प्रवासात मौल्यवान वस्तू बाळगू नका, अज्ञातांशी जास्त संपर्क करु नका, घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे सुरक्षित ठेवा, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात आणखी एक भोंदूबाबा गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तंत्र मंत्राच्या साह्याने उतारे काढून जडीबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील...