Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमPrakash Londhe : लोंढे पिता-पुत्राची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी

Prakash Londhe : लोंढे पिता-पुत्राची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

सातपूर ऑरा बार गोळीबार प्रकरणात (Satpur Firing Case) पोलीस कोठडीतून (Police Custody) न्यायालयीन कोठडीत गेलेला आरपीआयचा जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे यांना खंडणी प्रकरणी अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) ऑरा बार गोळीबारप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर लोंढे याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली.

दरम्यान, अंबड पोलीस ठाण्यात फिर्यादी अत्तरदे यांचा पुष्कर बंगला बळकावण्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पुढील चौकशीसाठी अंबड पोलिसांच्या पथकाने नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून लोंढे याला ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिसांनी (Ambad Police) अत्तरदे यांचा पुष्कर बंगला सील केला असून याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

ताज्या बातम्या

राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम...