Thursday, April 30, 2026
Homeक्राईमNashik Crime : लोंढे टोळीला 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी; भूषण लोंढे अद्यापही...

Nashik Crime : लोंढे टोळीला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; भूषण लोंढे अद्यापही फरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर (Satpur) येथील आयटीआय सिग्नलवरील (ITI Signal) हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणी (Firing Case) पोलीस कोठडीत असलेल्या प्रकाश लोढेसह त्याच्या साथीदारांना पोलीस कोठडी संपल्याने मंगळवारी न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

आयटीआय सिग्नल परिसरात रविवारी (दि. ५) रात्री दीडच्या सुमारास आयटीआय सिग्नलवरील बार बाहेर ‘प्रोटेक्शन मनी’च्या वादातून भूषण लोंढे (Bhushan Londhe) व टोळीने ग्राहक वरुण तिवारीवर गोळी झाडून जखमी केले होते. तसेच बारचालक पटेल व शर्मा यांच्याकडून दहा टक्के भागीदारीतून खंडणी उकळली होती. याप्रकरणी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह खंडणीप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.६) ऑरा बारचे चालक बिपीन पुरुषोत्तम पटेल, संजय शर्मा या दोघांच्या कुटुंबियांना संशयित प्रकाश लोंढे याच्यासह चौघांनी अपहरण करीत डांबून ठेवल्याचे समोर आले.

याप्रकरणी बुधवारी दुसरा (दि.८) गुन्हा दाखल झाला. तसेच, प्रकाश लोंढे हा राजकीय दबावातून तर त्यांची मुले साथीदारांच्या मदतीने हप्ता वसुली करत असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे व शुभम गोसावी हे पोलिसांच्या ताब्यात होते तर यातील मुख्य सूत्रधार भूषण लोंढे हा अद्याप फरार आहे. मंगळवारी (दि. १४) सर्व संशयितांना पोलिसांनी (Police) न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि. १७) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याच गुन्ह्यातील अन्य संशयित सनी विठ्ठलकर याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरभेदी भाडेकरू गजाआड; शिवाजीनगरमधील मुख्याध्यापकाच्या घरफोडीचा युनिट...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik ज्या भाडेकरूवर विश्वास ठेवून घरमालकाने त्याला आपल्या वास्तूत आसरा दिला, त्याच भाडेकरूने मालकाचा विश्वासघात केल्याचा प्रकार शिवाजीनगर भागातून (Shivajinagar Area)...