Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : प्रकाश लोंढे टोळीवर मोक्का; सर्वच मालमत्ता होणार 'सील'

Nashik Crime : प्रकाश लोंढे टोळीवर मोक्का; सर्वच मालमत्ता होणार ‘सील’

आयुक्तांकडून प्रस्तावावर स्वाक्षरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील ‘ऑरा’ बारमध्ये ‘प्रोटेक्शन मनी’तून गोळीबार (Firing) करण्यासह खंडणी, हप्ता वसुली, कब्जा, फसवणूक, दहशत निर्माण करणाऱ्या प्रकाश लोंढे (Prakash Londhe) उर्फ ‘बॉस’च्या टोळीवर मोक्का (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये सोमवारी (दि. २७) सायंकाळी प्रकाश लोंढे ग्रुपच्या सतरा जणांच्या टोळीवरील मोक्काच्या प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे येत्या काळात लोंढे टोळीची शहर व जिल्ह्यातील एकूण मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

- Advertisement -

ऑरा बारमधील राड्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित भूषण प्रकाश लोंढे (Bhushan Londhe) अजूनही पसार आहे. तर, ‘रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक संशयित प्रकाश लोंढे, शुभम उर्फ भुऱ्या राजू पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत राजू अडांगळे, दीपक उर्फ नानाजी प्रकाश लोंढे, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, अमोल बाबासाहेब पगारे, देवेश गजानन शेरताळे, शुभम रामगीर गोसावी, सनी उर्फ ललीत अशोक विठ्ठलकर, भूषण प्रकाश लोंढे उर्फ भाईजी, प्रिंस चित्रसेन सिंग, शुभम चंद्रकांत निकम, वेदांत संजय चाळगे, राहुल सत्यविजय गायकवाड, निखील मधुकर निकुंभ, संदीप रमेश गांगुर्डे या संशयितांना पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, या संशयितांविरुद्ध गोळीबार, खंडणी, हप्ता वसुलीसह कब्जा करणे, दहशतीसह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. त्यामुळे टोळीबर मोक्कांतर्गत कारवाईचा निर्णय आयुक्तालयाने घेतला आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या पथकाने लोंढेचे संपर्क कार्यालय ‘धम्मतीर्थ’ येथे धाड टाकून भुयार उद्धस्त केले होते. त्यामध्ये कुन्हाड, चाकूसह इतर प्राणघातक हत्यारे व महागड्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. ‘बेडरुम मध्ये आक्षेपार्ह वस्तूही सापडल्या होत्या व सीसीटीव्हींचा ‘डीव्हीआर’ जप्त केला होता. तर महापालिकेने तेथील कार्यालयाचे अतिक्रमण (Encroachment) जमीनदोस्त केले आहे. आता नव्याने मोक्कांतर्गत पुन्हा स्वतंत्र तपास होणार असून, लोंढे टोळीला कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

सर्व संशयित सराईत

संशयित भूषण लोंढे हा ‘आरपीआय’चा पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे. त्याच्यावर गोळीबार, हल्लाचे प्रयत्न, बेकायदेशीर मिरवणुकीचे गुन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी आव्हाड-गवळे दुहेरी हत्याकाडांत भूषण, सनी, प्रिन्स हे निर्दोषमुक्त झाले होते. मात्र, सात वर्षे कारागृहात होते. त्यांना अटकदेखील ‘सिनेस्टाइल’ झाली होती. यासह वेदांत चाळगे सराईत असून तो हर्षद पाटणकरणा कट्टर समर्थक आहे.

‘प्रोटेक्शन मनी’

संबंधित बार व हॉटेल मोहित नारंग यांच्या मालकीचे असून १ एप्रिल २०२५ पासून बिपिन पुरुषोत्तम पटेल व संजय शर्मा चालवित आहेत. तेव्हापासून लोंढे याने तेथे जात भांडण करून वातावरण दूषित केले. दोन्ही चालकांना ‘माझे माणसे ठेऊन हॉटेलची सुरक्षा पुरवित भांडण मिटवतो. त्या बदल्यात मला १० टक्के भागीदार म्हणून रक्कम द्यावी लागेल’, असा खंडणीसाठी दम भरला. दोन महिन्यांपूर्वी लोंढे याला दोघांनी खंडणी देण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून लोंढेसह त्याचे सर्व साथीदार हॉटेलात बसायचे, तेव्हा वाद न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...