Saturday, June 20, 2026
Homeक्राईमNashik Crime : मंडल अधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला

Nashik Crime : मंडल अधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला

नाशिकरोड | प्रतीनिधी | Nashik Road

मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला रॉयल्टी भरली का? अशी विचारणा केल्याच्या कारणावरून मंडल अधिकाऱ्यावर वाळू माफियांनी (Sand Mafia) कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता चिंचोली-मोहगाव रस्त्यावर घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मंडल अधिकारी सुनील शांताराम काकड (वय ३६, पांगरी, ता. सिन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ मार्च रोजी सायंकाळी शासकीय वाहनाने गस्त घालत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील मोहगाव-मोहदरी घाट परिसरात टाटा कंपनीचा ९१२ क्रमांकाचा टिपर मुरूम वाहतूक करताना दिसला. काकड यांनी वाहनचालकाला रॉयल्टी भरली का, अशी विचारणा केली असता चालकाने नकार देत वाहन नाशिकरोडच्या दिशेने पळवले. यानंतर काकड यांनी पाठलाग करून चिंचोली फाटा मोहगाव रस्त्यावरील (Mohogaon Road) ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयाजवळ वाहन थांबवले.

दरम्यान, यावेळी संशयित अमोल अर्जुन भिसे, अतुल धुळजी भिसे, अर्जुन भिसे तसेच त्यांच्या आणखी दोन साथीदारांना वाहन का थांबवत नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी काकड यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान अमोल भिसे याने धारदार कोयत्याने काकड यांच्या मानेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून तेथून पलायन केले.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1075 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...