Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : त्र्यंबकेश्वरात लोंढे टोळीचे कारनामे उघड; अटकेची शक्यता

Nashik Crime : त्र्यंबकेश्वरात लोंढे टोळीचे कारनामे उघड; अटकेची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी । Nashik

सर्वत्र नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणूक (Trimbakaeshwar Nagarparishad Election) रिंगणातील उमेदवारांसह नातलगांवर सातपूर पोलिसांत (Satpur Police) खंडणीचा गंभीर गुन्हा नोंद झाला आहे. यानिमित्ताने सातपूर येथील ‘पीएल’ टोळीचे त्र्यंबकेश्वरातील कारनामे समोर येत असून, संशयितांमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

- Advertisement -

सातपूर पोलीस ठाण्यात लोंढे टोळीविरुद्ध (Londhe Gang) खंडणी व कब्जा केल्याबाबत पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. सन २०२३ ते आतापर्यंत त्र्यंबकेश्वर येथील गट क्रमांक दहा ही जमीन काही वर्षांपासून वादग्रस्त आहे. त्या जमिनीच्या खरेदीसाठी अनेकदा व्यवहार झाले असून, लोंढे टोळीने त्यावर दोन वर्षांपूर्वी कब्जा करुन फलक लावला होता. फिर्यादीस शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळून ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे.

नागेश मटाले, भावेश मटाले, भूषण लोंढे, कैलास चोथे, शांताराम बागुल, समाधान ठोके, संकेत देवरे, सोनू खाटीकडे, अर्जुन पगारे, रवी उर्फ बाळा सोनवणे अशी संशयितांची नावे आहेत. त्यानुसार, नागेश व भावेश मटाले यांना अटक करण्यात आली आहे. संशयित चोथे हा स्वतः उमेदवारी करीत असून बागूल यांच्या पत्नी अनिता तसेच देवरे यांच्या मातोश्री संध्या देवरे नगरसेवक पदासाठी भाजपतर्फे त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान, यासह संशयित सोनवणे हे शिवसेना शिंदे पक्षाचे (Shinde Shivsena) नगरसेवक पदाचे उमेदवार असून, त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. या गंभीर गुन्ह्यानंतर शहर पोलीस (City Police) अद्याप उमेदवारांपर्यंत पोहोचले नाहीत.

टोळी रडारवर

नाशिक शहर पोलिसांनी ऑक्टोबरपासून लोंढेसह टोळीला गजाआड करून गोळीबार,खंडणी, ठार मारण्याचा प्रयत्न, अवैधरित्या कब्जा असे विविध स्वरुपाचे गुन्हे नोंद केले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यावर लोंढेचे नाव काढून मटाले नावाने फलक लावण्यात आल्याचे कळते. म्हणूण मटालेला रडारवर घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...