Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

Nashik Crime : मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

नाशिक | Nashik

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) टाकेद बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने (Principal) शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Sexually assaulted) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी घोटी पोलिसांनी मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी येथील शाळेत सहावीच्या वर्गात शिकत असून तिला वर्गशिक्षक गोरख जोशी याने मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या घरी पाठवले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले. यानंतर अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या (Family) लक्षात आले.

दरम्यान,यावेळी कुटुंबियांनी मुलीला विचारले असता पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) धाव घेतली. त्यानंतर घोटी पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवत मुख्याध्यापक साबळे आणि वर्गशिक्षक जोशी यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस (Police) पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...