Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime : चामरलेणी रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; म्हसरूळ पोलिस ठाणे...

Nashik Crime : चामरलेणी रस्त्यावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील घटना

पंचवटी | वार्ताहर | Panchvati

म्हसरूळ शिवारातील (Mahasrul Area) चामरलेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (रविवार दि.२२) रोजी पहाटेच्या सुमारास एका युवकाचा (Youth) मृतदेह (Dead Body) आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा मृतदेह नग्नावस्थेत असून, डोक्यात चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच मयताचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे दरम्यान असून, त्याच्या अंगावर शर्ट दिसत आहे. तर तोंडावर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीच्या (Beating) खुणा दिसत असल्याने हत्या करून मृतदेह टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तसेच या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे (Mhasrul Police Station) वरिष्ठ अधिकारी अंकुश चिंतामण , गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पटारे व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून (Police) मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे. तसेच यासंदर्भात म्हसरूळ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...