Friday, April 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याचा संशय; वधूपक्षाने केले विवाहित तरुणाच्या...

Nashik Crime : प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याचा संशय; वधूपक्षाने केले विवाहित तरुणाच्या मामेभावाचे कोर्टाजवळून ‘सिनेस्टाईल’ अपहरण

नाशिक | Nashik

प्रेमसंबंधातून (Love Marriage) आंतरजातीय विवाह केल्यानेच वडील (Father) निवर्तल्याचा संशय घेऊन या विवाहासाठी मध्यस्थी करणाऱ्या विवाहित तरुणाच्या मामेभावाचे वधूपक्षाने ‘सिनेस्टाईल’ अपहरण (Kidnapped) केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्हा न्यायालयाबाहेर (Nashik District Court) शुक्रवारी (दि. १९) दुपारी घडला. अपहरणकर्त्यांनी पोलिसांच्या धाकाने अपहरणकर्त्याला धमकी देऊन अखेर वणी पोलीस ठाण्यात सोडून पळ काढला. या घटनेने खळबळ उडाली असून नववधूसह तिचे नातलग व अॅड. कविता पाटील यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे प्रेमविवाहानंतर चारच दिवसांनी नवविवाहिता माहेरी आल्याने तिला नांदवण्यासाठी विवाहित तरुणाने न्यायालयात (Court) कौटुंबिक दावा दाखल केल्याने हा वाद झाल्याचे समोर आले आहे. मंगेश निवृत्ती उगले (४०, रा. तळेगाव-वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा आतेभाऊ यशवंत नारायण तिडके (रा. जानोरी, ता. दिंडोरी, सध्या रा दहावा मैल, ओझर) हा त्यांच्या घरी नेहमी येत जात असताना शेजारी राहणाऱ्या प्राजक्ता सुरेश सरोदे हिच्याशी त्याची ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात होऊन यशवंत आणि प्राजक्ता यांनी २० जानेवारी २०२५ रोजी घारपुरे घाटावरील साई वैदिक विवाह संस्थेत आंतरजातीय विवाह केला.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी प्राजक्ताचे वडील सुरेश यांचे निधन (Passed Away) झाले. या प्रेमविवाहासाठी यशवंतचा मामेभाऊ मंगेश यानेच मध्यस्थी केल्याने या विवाहामुळेच सुरेश यांचे निधन झाल्याचा प्राजक्ताच्या नातलगांचा समज आहे. तेव्हापासून त्यांनी मंगेशचा राग धरला; परंतु विवाहानंतर चार दिवसांतच प्राजक्ता पती यशवंतपासून स्वतंत्र होऊन माहेरी राहू लागली. त्यामुळे यशवंतने जिल्हा न्यायालयात पत्नी नांदण्यासाठी कौटुंबिक दावा दाखल केला. त्याची सुनावणी सुरू असून गुरुवारी (दि.१८) सुनावणी असल्याने यशवंत ओझर येथून नाशिककडे निघाला. तेव्हा दहावा मैल येथे त्यांना आतेभाऊ यशवंत भेटला.

दोघे किरकोळ काम आटोपून दुपारी सव्वादोन वाजता न्यायालयात आले. तेव्हा दुपारी तीनच्या सुमारास यशवंत सुनावणीसाठी कोर्टात असता मंगेश हे जुने सीबीएसजवळील भुयारी मार्गालगत थांबले. त्याचवेळी यशवंतची पत्नी संशयित प्राजक्ता, तिचा भाऊ अक्षय सुरेश सरोदे, मावसभाऊ प्रशांत मोरे, मामा शरद झाल्टे, मामेभाऊ व चुलतभाऊ शरद सरोदे, प्राजक्ताची आत्या यमुना लिंगायत आले व शरद सरोदे वगळता संशयितांनी ‘तू प्राजक्ताचा विवाह यशवंत सोबत का लावला?’ अशी विचारणा केली व सर्वांनी मारहाण केली. मंगेश यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे काही न ऐकता ‘यशवंतला केस मागे घ्यायला सांग’ असा दम भरला.

‘आमच्या बाजूने साक्ष दे’

संशयित अक्षय सरोदे व प्रशांत मोरे यांनी मंगेश यांना ‘तू विवाह लावून दिलाच नाहीये तर आमच्या बाजूने तशी साक्ष दे व लिहून दे’, असे म्हणूण भुयारी मार्गाजवळून संशयित अॅड. कविता पाटील यांच्या रूम चेंबरला नेले. अॅड. कविता यांनी टायपिस्टकडून स्टॅम्प पेपरवर मजकूर टाईप करून फोटो चिटकवून सही व अंगठा देण्यास सांगितले. नकार दिला असता कविता पाटील व यमुना लिंगायत व इतरांनी श्रीमुखात भडकावून जबरीने सही करण्यास भाग पाडले. त्यानंतर तवेरा कारमध्ये बळजबरीने बसवून संशयित शरद झाल्टे, अक्षय सरोदे, प्रशांत मोरे, शरद सरोदे व प्राजक्ता यांनी अपहरण करत वणी येथे नेले, असे फिर्यादीत नमूद आहे.

मुद्दे

  • संशयित प्रशांत व शरद झाल्टे यांच्याकडून गावात राहू न देण्याची धमकी
  • अॅड. कविता पाटील यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा दावा
  • संशयितांच्या अटकेचे प्रयत्न
  • कौटुंबिक वादाची सुनावणी सुरूच
  • विवाहितेने विवाह नाकारल्याचा पतीचा दावा

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...