Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : इन्फ्रास्ट्रक्चरमधील भागीदारी नडली; नाशिकच्या उद्योजकास अडीच कोटींचा गंडा

Nashik Crime : इन्फ्रास्ट्रक्चरमधील भागीदारी नडली; नाशिकच्या उद्योजकास अडीच कोटींचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘अर्थमुव्हर्स’ मशिनरीची विक्री आणि व्यवसायात (Business) भागीदार करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील (Thane) बदलापूरच्या एका व्यावसायिक कुटुंबातील तिघांनी नाशिकमधील उद्योजकाची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला असून मशिनरी खरेदीचे पैसे देऊनही त्याचा मिळत नसल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. ही घटना २०२२ मध्ये घडली असून, पाठपुरावा करूनही संशयितांकडून कोणतीही दाद मिळत नसल्याने अखेर तक्रार करण्यात आली.

- Advertisement -

संजीव शंकर आव्हाड, मीना संजीव आव्हाड, कार्तिक संजीव आव्हाड (सर्व रा. कावेरी अपार्टमेंट, कैलाश नगर, वालिवली, बदलापूर, जि. ठाणे) अशी संशयितांची नावे आहेत. संजय शांताराम सांगळे (५५, रा. पाटील लेन, कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, यश कन्स्ट्रवेल प्रा. लि. आणि एलोरा इपीसी प्रा. लि. या त्यांच्या बांधकाम कंपन्या असून त्यामार्फत ते व्यवसाय करतात. २०२१ मध्ये एकनाथ बोडके यांच्या माध्यमातून संशयित (Suspected) संजीव आव्हाड याच्याशी त्यांची ओळख झाली होती. त्यावेळी आव्हाड याने त्याच्या आव्हाड इन्फ्रा ड मायलिंग प्रा. लि. तसेच माऊली स्टोन क्रशर या कंपन्या असल्याचे सांगितले होते.

सांगळे यांना जेसीबी, पोकलेन आणि डंपरची आवश्यकता असल्याने त्यांनी आव्हाड यांना सांगितले होते. त्यावेळी आव्हाड याने बदलापूर आणि नागपूर येथील जुने परंतु वापरात असलेले जेसीबी, पोकलेन, डंपर विक्री करायचे असल्याचे सांगून ते खरेदी करा असे सांगळे यांना सांगून एक कोटींचा धनादेश घेतला. त्यानंतर, ही मशिनरी व वाहने रवाना करण्याचे आश्वासन आव्हाड याने दिले. परंतु वाहनांचा ताबा त्यांना मिळालाच नाही. त्याचदरम्यान, सांगळे यांना दगडखडीची गरज असल्याने ते बदलापूरला (Badlapur) गेले. त्यावेळी संशयित आव्हाड याने त्याच्या स्टोन क्रशर युनिटचा ५० लाखांत विक्रीचा व्यवहार सांगळे यांच्याशी ठरविला.

दरम्यान, मार्च २०२२ मध्ये सांगळे यांनी ५० लाखांचा धनादेशही दिला. सप्टेंबर २०२२ पर्यंतही हे साहित्य न आल्याने सांगळे पाठपुरावा करीत होते. त्यावेळी संशयित आव्हाड हा सांगळे यांना भेटण्यासाठी नाशिकला आला. मला एका प्रकल्पाचा ठेका मिळाला असून, त्यामुळे मायनिंग व्यवसायात तुम्ही भागीदार होण्यासाठी गळ घातली. त्यासाठी सांगळे यांची नागपूरवारीही घडविली. संशयितावर विश्वास ठेवून त्यांनी भागीदारीपोटी एक कोटींचा धनादेश दिला.

यामुळे झाले उघड

दोन कोटी ५० लाख रुपये देऊनही अर्थमुव्हर्स मशिनरी ताब्यात मिळाली नाही. तसेच, भागीदारीचे कागदपत्रेदेखील आले नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये सांगळे हे संशयित आव्हाड याच्या बदलापूरातील घरी गेले आणि विचारणा केली. त्यावेळ संशयित आव्हाड याच्यासह त्याची पत्नी व मुलगा यांनी संगनमताने वाद घातला. तसेच, मशिन्स, साहित्य व भागीदारीचे कागदपत्रे देण्यास नकार दिला. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, अखेर सांगळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...