Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : होम अरेस्टची लिंक जम्मूत

Nashik Crime : होम अरेस्टची लिंक जम्मूत

राजस्थान, नोएडा, झारखंड नंतर अतिसंवेदनशील क्षेत्रातून सायबर अटॅक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये (Nashik) काही दिवसांपूर्वी वयोवृद्ध महिलेस होम अरेस्टची भीती घालून २३ लाख रुपये उकळणाऱ्या सायबर टोळीचा (Cyber ​​Gang) सूत्रधार अतिसंवेदनशील जम्मू परिसरात दडून बसल्याचे नाशिक शहर सायबर पोलिसांच्या (Nashik City Cyber ​​Police) तपासात समोर आले आहे. त्यामुळे एकूणच सायबर टोळीने राजस्थान, नोएडा व झारखंडनंतर आता जम्मूमधूनही सायबर गुन्हे घडविण्याचा अड्डा व आश्रयस्थान शोधून काढले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा असून सायबर गुन्ह्यांची लिंक जम्मूत जाऊन मिळाली आहे. तर, आता नाशिक सायबर पोलिसांच्या अटकेत असलेल्या मदरशामधील बापलेकांच्या माहिती व उपलब्ध कागदपत्रांनुसार सायबर सूत्रधाराच्या जम्मूतील ठिकाणांचा शोध घेऊन पुरावे संकलन सुरु करण्यात आले आहे.

- Advertisement -

रवींद्रकुमार (रा. जम्मू) असे संशयित सायबर सूत्रधाराचे नाव आहे. त्याचा व्हॉट्सअॅप नंबर व अन्य ओळखीचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. मुंबई व दिल्ली गुन्हेशाखेतील पोलीस निरीक्षकाच्या वेशात किंवा सीबीआय व ईडी अधिकारी बोलत असल्याचे व्हिडीओ कॉलवरुन दर्शवून तक्रारदारास त्याच्या घरातच अटक करण्याची भिती दाखवून कोट्यवधी रुपये ऑनलाईन वळते करुन घेणाऱ्या सायबर गँगच्या सूत्रधाराची डिटेल्स मिळाल्याने आता नाशिक शहर सायबर पोलीस येत्या दोन, तीन दिवसांत जम्मूत (Jammu) दाखल होणार आहेत. तत्पूर्वी संशयिताचे ट्रेसिंग, लोकेशन व जवळील व्यक्तिंच्या कॉल्सचे तांत्रिक विश्लेषण करुन पुरावे संकलित केले जात आहे. शहरातील ६० वर्षीय महिलेस १३ डिसेंबर रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल करुन दिल्लीतील क्राईम ब्रँचमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. ‘मनी लॉण्ड्रिगमधील कमिशन तुमच्या बँक खात्यावर’ आल्याचे या महिलेस सांगितले.

यानंतर त्याने महिलेस धमकावत घरातच अटक केल्याची जाणीव करुन देत आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर चेकव्दारे तब्बल २३ लाख रूपये पाठविण्यास भाग पाडले. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असता पोलिसांनी तपास केला आहे. त्यात ज्या बँक खात्यावर पैसे वर्ग झाले होते, त्या खातेदाराला पोलिसांनी शोधून काढत उत्तरप्रदेशातील कनौज गाठले. तेव्हा दोघे संशयित बापलेक व एका मदरशाच्या मंडळावर कार्यरत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या सूचनेने तपास सुरु आहे.

दोघांना न्यायालयीन कोठडी

मदरशामधील असद अहमद खान (वय ३६, दोघे रा. कनौज, उत्तरप्रदेश व त्याचे वडील अली अहमद खान (५९) यांना पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी अटक करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोघांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्याने पोलिसांनी शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एका ट्रॅन्जॅक्शननुसार कमिशन

संशयित रवींद्रकुमार याने या बापलेकांची दिल्लीतील पहाडगंज येथे भेट घेतली. त्यांना विविध आमिषे दाखवून व बदल्यात कमिशन मिळेल असे सांगून दोघांसह मदरशाच्या बँकखात्याचा तपशील घेतला. यानंतर रवींद्रकुमारने काही तासांत दोन कोटी रुपयांचे व्यवहार फिरवले. मदरशाच्या नावाने देशभरातून त्याने इतर सायबर संशयितांच्या मदतीने संशयित बापलेकांच्या नावावर जमा करून घेतले. सूत्रधार आणि संशयित आरोपींमध्ये आणखी कोणते आर्थिक व्यवहार झाले आहेत, याचा तपास सुरु आहे.

मुद्दे

१) पहाडगंजमधील एका हॉटेलतात संशयिताचे स्टे बुकिंग
२) मुक्कामासाठी सादर केलेले ओळख पुरावे पोलिसांच्या ताब्यात
३) संशयितांचे ठराविक लोकेशन ट्रेस; तांत्रिक विश्लेषण सुरु
४) ठोस पुरावे, लोकेशन मिळताच नाशिकची टीम जम्मूला जाणार
५) सध्या प्राथमिक पुराव्यांची जुळवाजुळव
६) जम्मूतून देशभरात सायबर कारवाया सुरु असल्याचे अधोरेखित

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...