Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई; लाखो रुपयांचे...

Nashik Crime : पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई; लाखो रुपयांचे गॅस सिलिंडर जप्त

काळाबाजार असल्याचा संशय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सातपूर परिसरातील (Satpur Area) नाईस संकुलसमोर भर रस्त्यावर दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती आणि व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर (Gas Cylinders) संशयरित्या उभे असल्याने नाशिक पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी सातपूर पोलिसांसह सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात छापा टाकला असता यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यावेळी १५८ भरलेले आणि २८९ रिकामे असे एकूण ४४७ सिलिंडर आढळून आले. या संपूर्ण जप्त केलेल्या मुद्दे मालाची किंमत अंदाजे २५ लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू झाला आहे. या कारवाईत पोलीसांनी दोन छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रकही ताब्यात घेतला आहे. तसेच संबंधित एजन्सी चालकाने आपण काळाबाजार करत नसून सिलिंडर गोडाऊनमध्ये नेण्यासाठी वाहतूक करत असल्याचा दावा केला आहे. पंरतु, पुरवठा विभाग आणि सातपूर पोलीसांनी सदर दाव्याची पडताळणी करत या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू केला आहे.

आमच्या गॅस एजन्सीचे विल्होळी येथे गोडाऊन आहे. आम्ही याठिकाणी वाहतुकीसाठी गाड्या भरत होतो. मात्र, पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांना गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी छापा टाकून सिलिंडरसह गाड्या जप्त केल्या. परंतु, आम्ही गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत नव्हतो.

गॅस वितरक

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...