नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चामरलेणीच्या पायथ्याजवळ रविवारी (दि.२१) सकाळी कंटेनर चालकाच्या निर्घृण हत्येनंतर (Murder) संशयित (Suspect) मारेकऱ्यांचा (Killers) चार दिवस उलटूनही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. स्ट्रीटलाईटचा अभाव असलेल्या हायवेवर ही घटना घडल्यावर येथे एकही सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे मृत चालकाकडे मोबाईलच (Mobile) नसल्याने तपासात अडथळे येत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी म्हसरूळ पोलिसांसह (Mhasrul Police) गुन्हे शाखेसह तांत्रिक विश्लेषण विभागाची पथके कार्यरत झाली आहेत. दुसरीकडे ही हत्या का व कोणी केली हे कोडे उलगडण्यास अवधी लागण्याची शक्यता आहे. चामरलेणीच्या पायथ्याजवळ अनोळखी तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याचे समोर आल्यावर नऊ तासांच्या आत मृतदेहाची (Dead Body) ओळख पटवण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले होते.
उमेश आंबिगार (३४, रा. मरकुंडा, ता. बिदर, कर्नाटक) असे हत्या झालेल्या कंटेनरचालकाचे नाव असल्याचे समोर आले. तो कंटेनरचालक असल्याने गेल्या सात दिवसांपूर्वी हैदराबाद कंटेनरमध्ये साहित्य भरून दिंडोरीत जात होता, तेव्हा ही घटना घडल्याचे समोर आले. मारेकऱ्यांनी पहाटे आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील मुख्य रस्त्यावर कंटेनर अडवून कॅबिनमध्येच त्याची हत्या (Murder) केल्याचे उघड झाले होते. तपास सुरू असतानाच काही तासांनंतर बेवारस अवस्थेत केए ५६ ६८३० या क्रमांकाचा कंटेनरमध्ये आढळला.
दरम्यान, यानंतर वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण आणि तपास पथकासह फॉरेन्सिक पथक दाखल झाले. तेव्हा कंटेनरच्या कॅबिनमध्ये रक्ताने माखलेले हुक व रक्ताचे डाग आढळून आले. कंटेनर ताब्यात असला तरी ही हत्या कोणी केली? ते उघड होत नसल्याने आता पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह पांरपरिक तपासावर भर दिला आहे.
मारेकरी स्थानिक
चालक उमेशने घटनेच्या काही तासांआधीच कुटुबाला कंटेनरमधील डिझेल संपल्याची माहिती दिली होती. त्याने क्लिनरला त्याच्यासोबत नेले नसल्याचा दावा कुटुंबाने केला. त्यामुळे हत्येच्या प्रकरणात कोणीतरी पोलिसांचे लक्ष भरकटवत असल्याचा संशय आहे. हत्येनंतर त्याचा मृतदेह पायथ्याशी आणून टाकल्याचे समोर आले. मारेकरी स्थानिक असण्याचा संशय बळावला आहे.
ठळक मुद्दे
- कंटेनरच्या कॅबिनमध्ये रक्ताने माखलेले हुक.
- आठवडाभरापूर्वीच चालक उमेशवा मोबाईल हरवला.
- हॉटेलचालक किंवा कुणाकडूनही मोबाईल घेत कुटुंबाच्या संपर्कात
- गेल्या नऊ वर्षांपासून उमेशला मद्याचे व्यसन,
- ट्रकवरील नंबरमुळे त्याची ओळख पटली.
- चामरलेणी ते कंटेनर मिळाल्याचे अंतर केवळ दोन किलोमीटर.
- संशयित व मारेकरी ओळखीचे असण्याचा संशय





