नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad Industrial Estate) एका कंपनीच्या भितीला भगदाड पाडून चोरट्यांनी (Thieves) तब्बल १ कोटी ५४ लाखांचे साहित्य चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष बाळकृष्ण बाभुळकर (४३, रा. धर्मभक्ती कॉम्प्लेक्स, अंबड-लिंकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्नीपोर्ट सिस्टिम प्रा.लि. ही त्यांची कंपनी आहे. १४ ते २८ तारखे दरम्यान चोरट्यांनी कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडले आणि कंपनीमध्ये प्रवेश करीत तब्बल १ कोटी ५४ लाख ३८ हजार रुपयांचे कंपनीतील साहित्य चोरून नेले आहे. यात ३५ लाखांचे पाँवर प्रेस, १० लाखांचे इफ्रांसिस स्वीच गिअर यासह विविध कंपन्यांच्या महागडा डाईजर, इलेक्ट्रो फंच, सीएनसी फिक्स टुल्स, फिक्सिंग क्सेसरीज, ऑल मशिन रिक्वायर्ड टुल्स, स्पेशल टुल्स, डाईज हार्डवेअर, जनरल टुल्स ण्ड टॅकल्स, बॉक्स बायरिंग, कॉपरचा कच्चा माल, अॅल्युमिनिअमचा कच्चामाल, अॅल्युमिनियमचे रॉड, डाय मीटर व प्लेट, ब्राँसचा कच्चा माल, ब्रॉसचे गोल, चौकोणी रॉड, स्पेशन इंशुलेशन पेपर असा माल व साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे.
दरम्यान, अंबड पोलिसात (Ambad Police) घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल केला असून, चुंचाळे पोलीस चौकीचे उपनिरीक्षक संदीप शेवाळे तपास करीत आहेत.