Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशकात नेमकं चाललंय तरी काय? दहा महिन्यांत ४६ खून,...

Nashik Crime : नाशकात नेमकं चाललंय तरी काय? दहा महिन्यांत ४६ खून, सप्टेंबरमध्ये सात घटना

'स्ट्रीट पेट्राेलिंग' ची कमतरता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भाईगिरी, इन्स्टा रिल्स, काैटुंबिक वादासह वैमनस्य व किरकाेळ कारणातून शहरात जानेवारी ते ८ ऑक्टाबरपर्यंत खुनाच्या (Murder) एकूण ४६ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या इतिहासात (Nashik History) सन २०२५ मध्ये प्रथमच हे खूनसत्र घडले असून आकडेवारीचा विचार करता शहरात महिन्याकाठी चार खुनांची नाेंद झाली आहे. त्यामुळे नाशिककरांनी आता पाेलिसांकडे स्ट्रीट क्राईम नियंत्रणासाठी ‘स्ट्रीट पेट्राेलिंग’ मध्ये वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

- Advertisement -

नाशकात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. त्यामागील कारण म्हणजे ऐरवी शांत समजल्या जाणाऱ्या नाशिकमधील गुन्हेगारीचे (Crime) सत्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात सतत खुनाचे सत्र सुरूच असून, गाेळीबाराच्या घटना उघड हाेत आहेत. विशेष म्हणजे ‘नेटकरी’ देखिल वाढत्या खूनसत्रामुळे चिंतेत असून त्यांनी आपापल्या शैलीत विविध साेशल मिडीया अकाऊंटस् वर नानाविध ‘कमेंट’ करुन गुन्हे नियंत्रणासाठी नाशिककर पाेलिसांच्या साेबतीला आहेत, असे आवाहन केल्याचे दिसते.

काहींनी ‘वुई सपाेर्ट नाशिक पाेलीस’, ठाेकून काढा या गुंन्हेगारांना, नाशिककर तुमच्यासाेबत आहेत’, असे हॅशटॅग पाेस्ट करुन व्हायरल केले आहेत. त्याला हजाराे नेटिझन्सने लाईक केले आहे. दरम्यान, वाढते शहरीकरण, बदलत्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक व राजकारणासह बेराेजगारीलस्थितीमुळे वाढती गुन्हेगारी तापदायक ठरत आहे. पोलिसांनी कठोर भूमिका घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला असला, तरी गुन्हेगारी नियंत्रणासाठी पाेलिसांना सर्वच घटकांचा पाठिंबा मिळणे अपेक्षित असल्याची बाब अधाेरेखित हाेत आहे. 

साेशल मिडीयावर पाेस्ट व्हायरल

नाशिकमध्येच सर्वात जास्त बिबटे, नाशिकमध्येच सर्वात जास्त खड्डे आणि ‘नाशिकमध्येच सर्वात जास्त खून’ या स्वरुपाची पाेस्ट बुधवारी इन्स्टा, फेसबक, ट्विटर(एक्स) व व्हाट्स अॅपवर शेअर झाली. अनेकांनी या पाेस्टखाली नकारात्मक व सकारात्मक प्रतिक्रिया नाेंदविल्याचे दिसून आले. 

इतके खून व अशी कारणे

  • १४ – किरकाेळ वाद
  • ११- जुने वाद, वैमनस्य
  • १०- काैटुंबिक कलह
  • ३- मद्यासाठी पैशांची मागणी
  • १- वर्चस्ववाद- गुन्हेगारी
  • २ पार्किंगवरुन वाद
  • २- हातउसनवार मागणे- 
  • १ -अनैतिक संबंध
  • १ – मालमत्ता वाद
  • १- सिगारेट, वीडीसाठी पैशांची मागणी

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल...